ग्राहकांना मोठा झटका! या खाजगी बँकांनी घटवले FD वरील व्याजदर, वाचा नवे रेट्स

ग्राहकांना मोठा झटका! या खाजगी बँकांनी घटवले FD वरील व्याजदर, वाचा नवे रेट्स

खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी कर्जदाता असणाऱ्या बँकेने एफडीवरील (Fixed Deposite) व्याजदर कमी केले आहेत. एक आणि दोन वर्षात मॅच्यूअर होणाऱ्या एफडी रेट्समध्ये हे बदल करण्यात आले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: देशाच्या खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी कर्जदाता असणाऱ्या एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) त्यांच्या काही फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर घटवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या माहितीनुसार आता एक आणि दोन वर्षात मॅच्यूअर होणाऱ्या एफडीवरील रेट्स कमी करण्यात आले आहे. याशिवाय कोणत्याही कालावधीसाठी असणाऱ्या एफडीवरील व्याजदरात बदल करण्यात आलेला नाही आहे. नवीन दर 13 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. याआधी बँकेने ऑक्टोबरमध्ये देखील व्याजदरात बदल केले होते.

HDFC बँकेच्या एफडीवरील नवे व्याजदर

एचडीएफसी बँकेकडून अशी माहिती देण्यात आली आहे की, 1 आणि 2 वर्षांसाठी असणाऱ्या एफडीवर 4.90 टक्के व्याज मिळेल. नवीन दरानुसार 7 ते 14 आणि 15 ते 29 दिवसात मॅच्यूअर होणाऱ्या एफडीवर आता ग्राहकांना 2.5 टक्के व्याज मिळेल. तर 30 ते 45 दिवस,  46 ते 60 दिवस आणि 61 ते 90 दिवसांच्या  एफडीवर 3 टक्के व्याज मिळेल. तर 91 दिवस ते सहा महिन्यात मॅच्यूअर होणाऱ्या एफडीवर 3.5 टक्के आणि  6 महिने ते 9 महिने आणि 9 महिने ते 1 वर्षामध्ये मॅच्यूअर होणाऱ्या एफडीवर 4.4 टक्के व्याज मिळेल. एक वर्ष आणि दोन वर्षाच्या एफडीवर 4.9 टक्के दराने व्याज मिळेल.

(हे वाचा-आधार लिंक करताना या कारणामुळे आहे बँक खातं रिकामं होण्याची भीती! वाचा सविस्तर)

Axis बँकेने देखील बदलले व्याजदर

खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या अॅक्सिस बँकेने देखील व्याजदरात बदल केले आहेत. या बँकेचे नवे व्याजदरही 13 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. अॅक्सिस बँकेने 7 ते 29 दिवसांच्या एफडीवरील व्याजदर 2.50 टक्के,  30 दिवस ते 3 महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी असणाऱ्या एफडीवर 3 टक्के आणि 3 महिने ते 6 महिन्यापेक्षा कमी कालावधी असणाऱ्या एफडीवर  3.5 टक्के व्याजदर आहे. ग्राहकांना सहा महिने ते 11 महिने 25 दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी 4.40 टक्के व्याजदर मिळेल. तर 11 महिने 25 दिवसांपासून 1 वर्ष 5 दिवसापेक्षा कमी कालावधीसाठी असणाऱ्या एफडीवर  5.15 टक्के व्याज मिळेल.

काय आहेत SBI च्या एफडीवरील व्याजदर?

7 दिवस ते 45 दिवस - 2.9 टक्के

46 दिवस ते 179 दिवस - 3.9 टक्के

180 दिवस ते 210 दिवस - 4.4 टक्के

211 दिवस ते एक वर्षादरम्यान मॅच्यूअर होणाऱ्या एफडीवरील व्याजदर - 4.4 टक्के

एक वर्ष ते दोन वर्षादरम्यान मॅच्यूअर होणाऱ्या एफडीवरील व्याजदर - 4.9 टक्के

दोन वर्ष ते तीन वर्षादरम्यान मॅच्यूअर होणाऱ्या एफडीवरील व्याजदर - 5.1 टक्के

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 17, 2020, 10:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading