• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी! 18 तासांसाठी बंद राहणार बँकेच्या सेवा

HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी! 18 तासांसाठी बंद राहणार बँकेच्या सेवा

तुम्ही HDFC बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. HDFC Bank च्या काही ऑनलाइन सेवा शनिवारी आणि रविवारी एकूण18 तासांसाठी बंद असणार आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 21 ऑगस्ट: तुम्ही HDFC बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील खासगी क्षेत्रातील मोठी बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना (HDFC Bank Customer) विकेंडमध्ये काही सेवा वापरताना समस्येला तोंड द्यावं लागू शकतं. बँकेने अशी सूचना जारी केली आहे की त्यांच्या काही सेवा शनिवारी ते रविवारी एकूण 18 तास बंद राहणार आहेत. बँकेने ग्राहकांना ई-मेलच्या माध्यमातून नोटीस जारी केली आहे. डिजिटल बँकिंग सुविधा आणखी उत्तम करण्यासाठी बँकेकडून मेंटेनन्सचे काम केले जाणार आहे, त्याकरता ही सेवा बंद असणार आहे. कोणत्या वेळासाठी बंद असणार आहेत या सेवा? HDFC Bank ने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सेवा 21 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 9 वाजल्यापासून 22 ऑगस्ट दुपारी 3 वाजेपर्यंत प्रभावित होणार आहेत. बँकेने ग्राहकांना होणाऱ्या असुविधेबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. शिवाय त्यांनी यावेळी सहकार्य करण्याचे आवाहन ग्राहकांना केले आहे. हे वाचा-Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, काय आहेत आजचे इंधनाचे दर कोणत्या सेवा असणार बंद? बँकेने दिलेल्या माहितीनुसार, नेट बँकिंग (Net Banking) आणि मोबाइल बँकिंग (Mobile Banking) च्या सेवा या 18 तासाच्या कालावधीमध्ये प्रभावित होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जर काही नेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग संबंधित कामं पूर्ण करायची असतील तर ती आजच रात्री 9 वाजण्यापूर्वी पूर्ण करून घ्या. मेंटेनन्सचे काम सुरू झाल्यानंतर या सेवा वापरताना समस्या उद्भवू शकेल. हे वाचा-EPFO Update: निवृत्तीआधी नोकरी सोडल्यास PF च्या रकमेवर व्याज मिळणार का? बँकेने काय म्हटलं? बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या सूचनेत असं म्हटलं आहे की, प्रिय ग्राहक, एचडीएफसी बँकेबरोबर बँकिंग केल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला आशा आहे की तुम्ही आणि तुमचे प्रियजन सुरक्षित असाल. तुम्हाला सर्वोत्तम डिजिटल बँकिंग अनुभव देण्याच्या आमच्या सतत प्रयत्नांचा भाग म्हणून, आम्ही नियोजित मेंटेनन्स प्रक्रिया करत आहोत. या उपक्रमादरम्यान, कर्जाशी संबंधित सेवा प्रभावित होतील. या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: