मराठी बातम्या /बातम्या /मनी /

घर घेण्याचं स्वप्न आता 'स्वप्नच' राहणार? HDFCच्या ग्राहकांना मोठा धक्का

घर घेण्याचं स्वप्न आता 'स्वप्नच' राहणार? HDFCच्या ग्राहकांना मोठा धक्का

स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी

स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी

स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 02 ऑक्टोबर : स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरांत वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँकांनी कर्जं महाग करायला सुरुवात केली आहे. होम लोन देणारी देशातील आघाडीची खासगी बँक एचडीएफसी लिमिटेडनेसुद्धा आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.

आरबीआयकडून रेपो दरात 50 बेस पॉइंट्सने वाढ करण्यात आल्यानंतर एचडीएफसीनेसुद्धा होम लोनवरील दरांत 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली. विशेष म्हणजे, गेल्या 5 महिन्यांत एचडीएफसीकडून एकूण 7 वेळा दर वाढवण्यात आलेत.

एचडीएफसीने त्यांच्या कर्जाच्या व्याजदरात 50 बेस पॉइंट्सची वाढ जाहीर केल्यानं बँकेच्या गृहकर्जाचा ईएमआय वाढेल. एचडीएफसीने त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे की, ‘एचडीएफसीने गृह कर्जावरील रिटेल प्राइम लेंडिंग रेट (आरपीएलआर) वाढवला आहे. ज्यावर त्याचं अॅडजस्टेबल रेट होम लोन (एआरएचएल) बेंचमार्क आहेत. 50 बेसिस पॉइंट्सची जाहीर केलेली वाढ 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होईल.’

आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने (MPC) रेपो दर 5.40 टक्क्यांवरून 5.90 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. एप्रिल 2019 नंतरचा हा या दराचा उच्चांक आहे. या समितीमध्ये आरबीआयचे तीन सदस्य आणि तीन बाह्यतज्ज्ञांचा समावेश आहे. सहापैकी पाच सदस्यांनी दरवाढीच्या बाजूने मतदान केलं. ही दरवाढ होताच एचडीएफसीने त्यांच्या गृहकर्जाच्या दरांत वाढ केली.

आर्थिक धोरणात आरबीआयने म्हटलंय...

आरबीआयने एसडीएफ (SDF) दरातही अर्धा टक्का वाढ केली आहे. ऑगस्टमध्ये महागाई 7 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने आरबीआय दरांबाबत कठोर भूमिका घेईल, असा अंदाज लावला जात होता. या पूर्वी फेडरल रिझर्व्हनेही व्याजदरात झपाट्याने वाढ केली होती. त्यानंतर जगभरातील केंद्रीय बँकांनीही कठोर भूमिका घेतली आहे.

आरबीआयच्या गव्हर्नरांच्या मते, या भूमिकेमुळे आगामी काळात महागाई कमी होण्याची अपेक्षा आहे, आणि दुसऱ्या सहामाहीत म्हणजेच ऑक्टोबर ते मार्चदरम्यान महागाईचा दर 6 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो. हा दर सध्या 7 टक्क्यांवर गेला आहे. तर, आरबीआयचा अंदाज आहे की, जानेवारी ते मार्चदरम्यान महागाई दर 2 ते 6 टक्क्यांपर्यंत येईल.

महागाईचा दर नियंणासाठी गेल्या काहीकाळात सातत्याने रेपो दरांत वाढ करण्यात आली. पण त्यामुळे कर्जाचे दर वाढू लागले असून, गृहकर्जाचा हप्ता वाढू लागला आहे. याचा फटका कर्जावर घर खरेदी करणाऱ्यांना बसतोय.

First published:

Tags: Hdfc bank