• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • #MaaKiKhushiKeLiye या मोहिमेच्या माध्यमातून HDFC Bank अनेक मातांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवून साजरा करत आहे मातृदिन

#MaaKiKhushiKeLiye या मोहिमेच्या माध्यमातून HDFC Bank अनेक मातांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवून साजरा करत आहे मातृदिन

2021 मधील मातृदिन (Mothers Day 2021) हा महामारीच्या या काळात आपल्याला एकमेकांपासून दूर राहावे लागत असल्याने नेहमीप्रमाणे वाटत नसला तरीही सामाजिक अंतर राखूनही मायलेकरांमधले बंध तितकेच मजबूत राहतात.

 • Share this:
  HDFC Bank ने या मातृदिनी एक हृदयस्पर्शी मोहीम केली आहे ज्यामध्ये आपले मूल जबाबदार, निरोगी आणि सुरक्षित असल्याचे पाहून विविध मार्गांनी एखाद्या मातेला मिळणारा आनंद आणि कृतार्थता अधोरेखित केली जाते. विशेष करून अशा कठीण प्रसंगी, आई आपले मूल सर्व प्रकारच्या सुरक्षिततेची काळजी घेते आहे की नाही, वेळेवर जेवते की नाही, आपल्या आरोग्याची काळजी घेते की नाही आणि या आत्ताच्या महामारीत सर्व प्रकारचे ताण आणि आव्हाने यांचे व्यवस्थापन करू शकते की नाही याची सतत चिंता करत असते. म्हणूनच, एक लेकरू म्हणून आपण सुरक्षित आणि या अपूर्व बदलांना चांगल्या प्रकारे स्वीकारत आहोत याचा विश्वास हीच आपण आपल्या निःस्वार्थ मातांना सर्वोत्तम भेट ठरेल. #MaaKiKhushiKeLiye ही एक साधी पण प्रभावी संकल्पना आहे, या मातृदिनी तिची HDFC Bank ने निवड केली आहे आणि एका हृदयस्पर्शी आणि प्रसंगोचित मोहीम आकारास आणली. येथे व्हिडिओ पहा. हृदयस्पर्शी क्षणांच्या एका संग्रहाच्या माध्यमातून, या अनोख्या मोहिमेद्वारे मातांनी दिलेल्या अमूल्य शिकवणीमुळे त्यांच्या मुलांना जबाबदार, स्वतंत्र आणि काळजीवाहू व्यक्ती बनण्यास मदत होते अशा अशा दैनंदिन जीवनातील क्षणांची वर्णने मिळून एकत्रितपणे एक विलोभनीय कथा विणली जाते. या व्हिडिओमध्ये चार वेगवेगळ्या माता आणि त्यांच्या अपत्यांचा समावेश आहे, त्यातील मातांच्या चेहऱ्यावर आपल्या मुलांच्या जबाबदारीपूर्ण वर्तन आणि त्यांनी केलेल्या निरोगी आणि आनंदी जीवनाच्या निवडीमुळे हास्य झळकते. हा व्हिडिओ सकारात्मक संदेशांची एक शृंखला सादर करतो आणि आपल्या मुलांचे सद्गुण आणि जबाबदारीपूर्ण वर्तन यांमुळे मातांना वाटणारा अभिमान आणि कृतार्थता यांचे सार टिपतो. येथे रंगवलेल्या परिस्थिती या सत्य घटनांचे प्रतिबिंब दर्शवतात, जसे की, एक मुलगा बाहेर जाण्याऐवजी स्वयंपाक करतो, एक मुलगी घरून काम करते आहे, दुसरी मुलगी दूरस्थ पद्धतीने आपला व्हिडिओ KYC पूर्ण केल्याबद्दल आणि घरबसल्या HDFC Bank मध्ये खाते उघडल्याबद्दल तिचे अभिनंदन करते, किंवा एक मुलगा COVIDची लस घेतो. या सर्व छोट्या छोट्या कृती प्रत्येक आईची मनःस्थिती सुधारण्यास मदत करते आणि आपले मूल सुरक्षित आणि आनंदी असल्याचे कळल्यावर तिच्या चेहऱ्यावर कृतकृत्यतेचे हसू फुलते. म्हणूनच, या मातृदिनी #MaaKiKhushiKeLiye तो साजरा करण्यासाठी आणि आपल्या आपल्या विलक्षण आईच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी काही गोष्टी करुया. This article has been created by the Studio18 team on behalf of HDFC Bank.
  First published: