Home /News /money /

चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत? काळजी करू नका, परत मिळवण्याचे 'हे' आहेत उपाय

चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत? काळजी करू नका, परत मिळवण्याचे 'हे' आहेत उपाय

ज्या व्यक्तीच्या खात्यात पैसे गेले आहेत, त्यांनी ते परत करण्यास नकार दिल्यास प्रकरण गुंतागुंतीचे होऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला न्यायालयाची मदत घ्यावी लागेल. तुम्हाला न्यायालयाकडून नोटीस पाठवून कायदेशीर कारवाई करावी लागेल.

    मुंबई, 10 एप्रिल : नेटबँकिंग आणि UPI वॉलेटद्वारे पैसे ट्रान्सफर करणे सामान्य झाले आहे. अगदी एक रुपयापासून लाखो रुपयांपर्यंतचे व्यवहार काही सेकंदात होतात. घरभाडं, लाईट बिल, मोबाईल रिजार्ज, ईएमआय अशा अनेक गोष्टींसाठी आपण ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करतो. पण, घाईगडबडीत तुमचे पैसे चुकीच्या खात्यात गेले तर? ते परत मिळवता येतात का? आपले पैसे पुन्हा मिळवण्यासाठी काय प्रक्रिया आहे. कृपया मॅसेज आणि ईमेल तपासा तुम्ही कुठेही पैसे ट्रान्सफर (Money Transfer) करता तेव्हा तुम्हाला तुमच्या खात्यातून पैसे कापण्यासाठी एक मेसेज आणि ईमेल मिळेल. पैसे हस्तांतरित केल्यानंतर संदेश आणि ईमेल तपासून खात्री करा. याच्या मदतीने पैसे चुकीच्या खात्यात गेले की नाही हे लगेच कळू शकते. जर तुम्ही चुकून इतरत्र पैसे पाठवले असतील, तर उशीर न करता तुमच्या बँकेला कळवा. यासाठी बँकेच्या कस्टमर केअरला फोन करता येईल. बँक तुम्हाला यासंबंधीची सर्व माहिती ईमेलवर विचारू शकते. ईमेलमध्ये सर्व पुरावे जोडताना, व्यवहार क्रमांक, रक्कम, कोणत्या खात्यातून पैसे कापले गेले, कोणत्या खात्यात पैसे चुकून ट्रान्सफर झाले, व्यवहाराची तारीख आणि वेळ इत्यादी सर्व माहिती द्या. अशा चुकीवर पैसे परत मिळतात बर्‍याच वेळा आयएफएससी (IFSC Number) क्रमांक चुकीचा प्रविष्ट केला जातो किंवा आपण प्रविष्ट केलेले बँक खाते अस्तित्वात नसते. अशा वेळी तुमच्या खात्यातून पैसेही कापले गेले तर रक्कम आपोआप परत जमा होईल. जर पैसे आपोआप परत आले नाहीत तर तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन मॅनेजरकडे तक्रार करा. जर प्रकरण फक्त एकाच शाखेचे असेल तर पैसे लवकरच परत केले जातील. Personal Loan की Gold Loan तुमच्यासाठी कोणतं फायदेशीर? शाखेला भेट देऊन तक्रार करा ज्या खात्यात पैसे गेले आहेत ते दुसऱ्या बँकेचे किंवा शाखेचे असल्यास पैसे परत मिळण्यास विलंब होऊ शकतो. अशा प्रकरणांमध्ये, पैसे परत मिळण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. कोणत्या बँकेच्या शाखेने व्यवहारावर प्रक्रिया केली आहे, याची माहिती तुम्हाला तुमच्या बँकेकडून मिळेल. तुम्ही थेट त्याच बँकेच्या शाखेशी संपर्क साधू शकता. संबंधित बँक शाखा त्या व्यक्तीशी संपर्क साधेल आणि पैसे परत करण्यासाठी संमती घेईल. त्यानंतर ज्याच्या खात्यातून चुकून डेबिट झाले आहेत अशा व्यक्तीला आपले पैसे परत मिळतील. हे आहेत कायदेशीर उपाय ज्या व्यक्तीच्या खात्यात पैसे गेले आहेत, त्यांनी ते परत करण्यास नकार दिल्यास प्रकरण गुंतागुंतीचे होऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला न्यायालयाचा सहारा घ्यावा लागेल. तुम्हाला न्यायालयाकडून नोटीस पाठवून कायदेशीर कारवाई करावी लागेल. यासाठी बँकांचा दोष नाही, असे रिझर्व्ह बँकेचे नियम सांगतात. सर्व तपशील तुम्ही स्वत: भरत असल्याने सर्व जबाबदारीही तुमचीच बनते. आरबीआयचा हा नियम उपयुक्त अशा स्थितीसाठी आरबीआयने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. जर तुम्ही पैसे भरले किंवा कुणाला पैसे पाठवले, तर खात्यातून पैसे कापल्याच्या मेसेजमध्ये तुम्ही हा व्यवहार चुकून केला आहे का, हे विचारणे गरजेचे आहे. त्या मेसेजमध्ये नंबर किंवा ईमेल देणेही आवश्यक आहे. जर चुकून पैसे ट्रान्सफर झाले असतील किंवा चुकीच्या खात्यात गेले असतील तर लगेच त्या नंबरवर किंवा ईमेलवर तक्रार करा. चुकून पैसे कापण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. या प्रक्रियेलाही कमी वेळ लागतो.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Bank services

    पुढील बातम्या