Home /News /money /

‘हर घर चुपचाप से कहता है': काही वर्षांपूर्वी एका पिढीवर एक वेगळा ठसा उमटवणारी, टीव्हीवरील एक जाहिरात आपल्याला पुन्हा एक महत्त्वाचा संदेश देत आहे

‘हर घर चुपचाप से कहता है': काही वर्षांपूर्वी एका पिढीवर एक वेगळा ठसा उमटवणारी, टीव्हीवरील एक जाहिरात आपल्याला पुन्हा एक महत्त्वाचा संदेश देत आहे

Asian Paints’ ने पुन्हा सुरू केलेले त्यांचे आधीचे कॅम्पेन ‘हर घर चुपचाप से कहता है

  मनुष्य हा सामाजिक प्राणी असल्याने माणसांना एकमेकांच्या सहवासात राहण्याची गरज भासते. म्हणूनच आपल्या सर्वांना 'क्वारंटाईन' या शब्दाची भीती वाटणे सहाजिक आहे. सर्वत्र तणावाचे वातावरण असले तरीही आपण आपल्या कुटुंबियांसोबत एकत्र वेळ घालवत आहोत, ही आपल्याला एकमेकांशी नाते आणखी घट्ट करण्याची एक चांगली संधी मिळाली आहे असे म्हणायला हरकत नाही. एकमेकांसोबत आपण घालवत असलेले हे दिवस व हेच ते क्षण आपल्या सर्वांनाच लॉकडाउन संपल्यावर आणखी मोलाचे वाटतील. आपले घर आणि आपले कुटुंब यांचा आपल्याला आयुष्यभरासाठी पाठिंबा असल्याने, Asian Paints’ ने पुन्हा सुरू केलेले त्यांचे आधीचे कॅम्पेन ‘हर घर चुपचाप से कहता है', या परिस्थितीत तंतोतंत लागू पडत आहे, असे म्हणणे योग्य ठरेल. आपल्याला आनंद देणार्‍या व एरवी वेळ नसल्याने आपण टाळत असलेल्या काही गोष्टी करण्याचा व छंद जोपासण्याचा हाच तो क्षण आहे व हीच ती वेळ आहे, ही आठवण करून देणारा या कॅम्पेनचा मूळ संदेश आहे. 2007 रोजी पहिल्यांदा टीव्हीवर सुरू केलेले व प्रेक्षकांच्या मनाला भावलेले हे कॅम्पेन, सध्याची परिस्थिती लक्षात घेता पुन्हा नव्याने तयार करण्यात आले आहे. एक वेगळा दृष्टीकोन निर्माण करणारे हे कॅम्पेन तेवढेच हृदयस्पर्शी आहे. धकाधकीच्या जीवनात आपल्याला अनेक गोष्टींचा आस्वाद घेता येत नाही. परंतु, हा ब्रॅंड, अशा परिस्थितीतही आपल्याला अनेक आवडीनिवडी जोपासण्याची हीच ती वेळ असल्याची आठवण करून देतो. या व्हिडिओमध्ये अनेक कुटुंबे दैनंदिन जीवनातील व एरवी कंटाळवाणी वाटणारे अनेक उपक्रमे करताना दिसून येतात; परंतु, क्वारंटईनदरम्यान तीच उपक्रमे आपल्याला खूप काही सांगतात. कुटुंबीय एकमेकांशी दिलखुलास गप्पा मारत असल्याचे, एकमेकांसोबत निरनिराळे खेळ खेळत असल्याचे, आपापल्या घरी एकत्र हसत खेळत वावरत असल्याचे काही झलक पाहताना, जणू आपले सध्याचे काही क्षण आपल्या डोळ्यासमोर असल्याचे वाटते. या व्हिडिओमध्ये घरगुती वातावरण पाहून आपणच त्या व्हिडिओचा एक भाग असल्याचे आपल्याला जाणवते. शिवाय या भावनात्मक दृष्टीकोनाव्यतिरिक्त 'घरातच रहा व सुरक्षित रहा' असा महत्त्वाचा संदेशही दिला आहे. आधीचे कॅम्पेन तयार करणार्‍या व प्रसिद्ध ॲडव्हर्टायजिंग एजन्सी ओगिल्व्हीमधील प्रतिभावंत व्यक्तिमत्व पीयूष पांडे व त्यांच्या संघाने हा व्हिडिओ 13 वर्षांनंतरसुद्धा पुन्हा नव्याने व तेवढ्याच जिद्दीने एक विलक्षण कॅम्पेन तयार केले आहे. ‘हर घर चुपचाप से कहता है' हे कॅम्पेन कुटुंबाचे महत्त्व, घर हेच सुरक्षित ठिकाण असल्याचा संदेश व चार भिंतीत आनंदाने एकत्र वेळ घालवणार्‍या कुटुंबियांमुळे या घराला आलेले घरपण दर्शवते. Asian Paints’ हा लोकप्रिय ब्रॅंड वर्षानुवर्षे विलक्षण घरं तयार करत आहे व या हलाखीच्या परिस्थितीत लोकांना घरात रहा व सुरक्षित रहा हा महत्त्वाचा संदेश देत आहे ही कौतुकास्पद गोष्ट आहे.
  This is a partnered post.
  Published by:Manoj Khandekar
  First published:

  Tags: Corona

  पुढील बातम्या