1 रुपयात खरेदी करा 24 कॅरेट सोनं, 'ही' आहे नवी योजना

हे विक्रीला असलेलं सोनं 24 कॅरेट 999.9 शुद्ध असल्याचा दावा कंपनीनं केलाय.

News18 Lokmat | Updated On: May 7, 2019 03:09 PM IST

1 रुपयात खरेदी करा 24 कॅरेट सोनं, 'ही' आहे नवी योजना

मुंबई, 07 मे : अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. पण पैसे कमी असतात, त्यामुळे अनेकांना सोनं खरेदी करता येत नाही. पण तुम्हाला हे ठाऊक आहे का, की तुम्ही 1 रुपयांमध्ये सोनं खरेदी करू शकता. आॅनलाइन कंपनी ग्राहकांना विशेष करून तरुणांना आकर्षित करतायत. जाणून घेऊ या खास स्किमबद्दल -

1 रुपयात सोन्याची खरेदी -

ई वाॅलेट पेटिएमनं सोन्याची सेवा सुरू केलीय. यात तुम्ही 1 रुपयांमध्ये सोनं खरेदी करू शकता. तुम्ही 1 रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंत सोनं खरेदी करू शकता. हे विक्रीला असलेलं सोनं 24 कॅरेट 999.9 शुद्ध असल्याचा दावा कंपनीनं केलाय. तुम्ही या सोन्याची खरेदी केलीत की ते लाॅकरमध्ये ठेवलं जातं. मग तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही घरी सोन्याची डिलिव्हरी घेऊ शकता.

'हा' व्यवसाय सुरू केलात तर रोज कमवाल 4 हजार रुपये

अशी करा खरेदी

Loading...

पेटिएम गोल्डवरून सोनं खरेदी करण्यासाठी तुम्ही पेटिएम अॅपवर गोल्ड आॅप्शनवर क्लिक करा. इथे तुम्ही सोनं खरेदी करू शकता. हे सोनं एमएटीसी-पीएमपीच्या लाॅकरमध्ये सुरक्षित राहील. खरेदीबरोबर तुम्ही इथे सोनं विकूही शकता.


हवी तेव्हा मिळेल घरपोच

पेटिएम गोल्ड 100 टक्के शुद्ध असल्याचं कंपनी म्हणालीय. तुम्हाला हे सोनं घरपोच 1,2,5, 10, 20 ग्रॅम नाण्यात मिळेल. याशिवाय पेटिएम तुम्हाला आपल्या प्लॅटफाॅर्मवर डिजिटल ट्रान्झॅक्शन केल्यानंतर कॅशबॅकच्या रूपात डिजिटल गोल्ड घेण्याचा पर्यायही उपलब्ध करून देतं.

अक्षय तृतीयेनिमित्त 'इथून' खरेदी करा सोन्याचे दागिने, मिळेल 'मोठं' डिस्काउंट

बुलियन इंडियाकडून 300 रुपये सोनं

पेटिएम गोल्डशिवाय बुलियन इंडियाकडूनही तुम्ही सोनं खरेदी करू शकता. इथे कमीत कमी तुम्ही 300 रुपयांमध्ये सोनं खरेदी करू शकता. ही कंपनी एमएमटीसी-पीएएमपीप्रमाणे तुमचं सोनं लाॅकरमध्ये सुरक्षित ठेवतं. तुम्हाला हवं तेव्हा घरपोच मिळू शकतं.

14 मे रोजी होणार सचिन आणि लक्ष्मणची साक्ष

ईटीएफही आहे एक पर्याय

तुम्हाला सोनं गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवता येईल. गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक केली तर कर सवलतही मिळू शकते.


VIDEO: सत्ता, समृद्धीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे देवाकडे साकडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 7, 2019 03:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...