इम्तियाज अहमद, प्रतिनिधी भुसावळ : वर्षभरातून तीन ते चार वेळा येणारा गुरुपुष्यामृत या मुहूर्तावर सोने खरेदी केले जाते. या दिवशी केलेली सोन्याची खरेदी ही अक्षय असते हे सोनं पवित्र व टिकून राहतं अशी भारतीय नागरिकांची धारणा आहे. सोन्याचा भाव अधिक असून देखील ग्राहकांची बाजारामध्ये बऱ्यापैकी गर्दी आणि उलाढाल दिसून येत आहे.
भारतीय परंपरेत या मुहूर्ताला मोठा मान असतो, त्यामुळे आजच्या दिवशी सोनं घेण्याकडे नागरिकांचा कल दिसून येतो. गुरुपुष्य अमृत च्या शुभ मुहूर्तावर भुसावळमध्ये सोने बाजारात ग्राहकांची उस्फुर्त गर्दी पाहायला मिळाली आहे.
24 कॅरेट सोन्याचा दर 61.000 प्रति तोळा
चांदी भाव प्रति किलो- 75.000
आज गुरुपुष्यामृत योग! कोणतंही शुभ कार्य, खरेदी कराल त्यात होईल अनेक पटींनी वाढ
मुंबईमध्ये सोन्याचे दर 60,870 प्रती तोळा आहेत. तर 22 कॅरेटचे दर 55,800 रुपये प्रति तोळा आहे. हाच दर गेल्या काही दिवसांपासून 57 हजार रुपयांवर होता. आज गुरुपुष्यामृताला सोन्याचे दर उतरल्याने सोनं खरेदीसाठी सराफ बाजारात गर्दी जमली आहे. लग्नाचे मुहूर्त जून अखेरपर्यंत आहेत. त्यामुळे सोनं खरेदीसाठी सराफ मार्केटमध्ये गर्दी जमली आहे.
मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा काल दर 61 हजार 360 होता. आज सोनं 60 वर आल्याने लोकांमध्ये खरेदीचा उत्साह आहे. 22 आणि 20, 18 कॅरेटचे दर कमी झाल्यामुळे लोक खरेदीसाठी पुढे आले आहेत.
Gold Silver Rate: ही संधी सोडू नका! 60 हजारांच्या खाली आलं सोनं, चांदीची चमकही झाली कमी
गुरुपुष्यामृत योग शुभ कालावधी
ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा हा दुर्लभ गुरुपुष्यामृत योग तयार होतो. गुरुपुष्यामृत योगाला गुरु पुष्य नक्षत्र योग असेही म्हणतात. हा नक्षत्र योग अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. जर तुम्हाला वर्षभर शुभ कार्यासाठी कोणताही दिवस मिळत नसेल तर तुम्ही ते काम गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी करू शकता.
25 मे रोजी सूर्योदयापासून सायंकाळी 05:54 पर्यंत गुरुपुष्यामृत योग आहे. या दिवशी संध्याकाळी 05:54 पासून आश्लेषा नक्षत्र सुरू होते. अशा स्थितीत 25 मे रोजी सकाळपासून 05:54 वाजेपर्यंत तुम्ही शुभ वस्तूंची खरेदी करू शकता. कोणतेही शुभ कार्य करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Jalgaon