मुंबई: गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल एकीकडे येत आहेत. गुजरातमध्ये भाजपने दीडशेहून अधिक जागांनी विजय विजय मिळवल्याचं निश्चित झालं आहे. अशा सगळ्या परिस्थितीत शेअर मार्केटवर नेमका काय आणि कसा परिणाम झाला याची उत्सुकता देखील आहे.
जागतिक बाजाराच्या दबावाला न जुमानता भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी तेजी निर्माण केली आणि सलग चार दिवसांपासून सुरू असलेली चार दिवसांची घसरण मोडून काढली. आज जागतिक बाजारात घसरण सुरू आहे, मात्र देशांतर्गत गुंतवणूकदारांची भावना सकारात्मक दिसत आहे. गुंतवणूकदारांनी सुरुवातीच्या व्यवहारात खरेदी करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे शेअर मार्केट उघडताच बाजार तेजीत दिसून आला.
सेन्सेक्स 93 अंकांच्या वाढीसह 62,504 वर उघडला. तर निफ्टी 10 अंकांच्या वाढीसह 18,571 वर उघडला. शेअर मार्केट सुरू झाल्यानंतर काही वेळातच सेन्सेक्स ५० अंकांनी वधारून सकाळी 62,461 वर पोहोचला, तर निफ्टीने 9 अंकांच्या वाढीसह 18,570 वर व्यवहार सुरू केला.
बँक, आयटी सेक्टरच्या शेअर्सवर जास्त लक्ष राहणार आहे. तर दुसरीकडे सोन्याचे दर वाढले आहेत. गोल्ड 54 हजार पार गेलं आहे. कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या आहेत.
निवडणुकीच्या निकालांचे विशेष परिणाम दिसून येतीलच असे नाही असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. आज मार्केटची स्थिती बाजार बंद होताना कधी राहणार याकडे लक्ष असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujarat, Share market