नवी दिल्ली, 17 जानेवारी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स (FADA) कडून दुचाकीवरील जीएसटी (GST Rate Cut on Two Wheelers) दर 18 टक्के कमी करण्याची मागणी पुढील महिन्यात सादर होणाऱ्या 2022 च्या अर्थसंकल्पात (Budget 2022) करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात वाहनांच्या मागणीत मोठी घट झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. सरकारने जीएसटीच्या दरात कपात केल्यास मागणी वाढून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
FADA ने म्हटले आहे की, दुचाकी हे काही लक्झरी उत्पादन नाही. त्यामुळे जीएसटी दर कमी करण्याची गरज आहे. देशातील 15,000 हून अधिक ऑटोमोबाईल डीलर्सचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या या संघटनेने टू-व्हीलरवरील जीएसटी 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची विनंती वित्त मंत्रालयाला (Finance Ministry) केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 रोजी 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
हे वाचा -
Budget 2022: अर्थसंकल्पात येणाऱ्या या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहितेय का? सोप्या भाषेत घ्या समजून
जीएसटी कपातीमुळे दुचाकींची मागणी वाढणार
दुचाकी ही चैनीची वस्तू म्हणून वापरली जात नसल्याचे एफएडीएने म्हटले आहे. सामान्य लोक दैनंदिन कामाचा निपटारा करण्यासाठी त्याचा वापर करतात. त्यामुळे 28 टक्के जीएसटीसह 2 टक्के उपकर लावणे योग्य नाही. लक्झरी उत्पादनांवर सेस लावला जातो. कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने वाहनांच्या किंमती सातत्याने वाढत असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. अशा परिस्थितीत, जीएसटी दर कमी केल्याने खर्चात घट आणि मागणी वाढण्यास मदत होईल.
हे वाचा -
Budget 2022 : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सध्याचा टॅक्स स्लॅबनुसार किती टॅक्स भरावा लागतो? चेक करा डिटेल्स
दुचाकींची विक्री 10 वर्षातील सर्वात कमी
SIAM ने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मोटरसायकल-स्कूटर आणि मोपेडच्या विक्रीत (Domestic two wheeler sales) सातत्याने घट होत आहे. एप्रिल 2021 ते डिसेंबर या कालावधीत दुचाकी विक्रीने गेल्या दशकातील नीचांकी पातळी गाठली आहे. 2020 च्या तुलनेत एप्रिल-डिसेंबर 2021 मध्ये कमी वाहनांची विक्री झाली. 2020 च्या याच कालावधीत दुचाकींच्या एक कोटी युनिटची विक्री झाली. मात्र, या काळात प्रवासी कार आणि प्रीमियम कारच्या विक्रीत वाढ झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.