मुंबई, 2 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून GST वरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेतील खाद्यपदार्थांवर जीएसटी (GST) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर किंवा ट्रेनमधून प्रवास करून जेवणाची ऑर्डर दिल्यास त्यांना खाद्यपदार्थांवर 5 टक्के जीएसटी (GST On Train Food) भरावा लागेल. तुम्ही आयआरसीटीसी कॅटरिंगमधून किंवा विक्रेत्यांकडून अन्न खरेदी करत असाल तर तुम्हाला जीएसटी द्यावा लागेल.
हा संभ्रम दूर करताना दिल्ली अपीलेट अथॉरिटी फॉर एडव्हांस रूलिंग्स (AAAR) सांगितलं की, जर एखाद्या प्रवाशानं रेल्वे प्लॅटफॉर्मवरून वर्तमानपत्रे खरेदी केली तर त्यावर जीएसटी भरावा लागणार नाही, परंतु रेल्वे स्टेशन किंवा ट्रेनमध्ये खाण्यापिण्याची कोणतीही गोष्ट खरेदी केल्यास प्रवाशांना 5 टक्के जीएसटी भरावा लागेल.
AAAR नं म्हटलं आहे की, ट्रेन हे वाहतुकीचं साधन असल्यानं त्याला रेस्टॉरंट, भोजनालय, कॅन्टीन इत्यादी म्हणता येणार नाही. त्यात प्रवाशांना सेवा देण्याचा समावेश नाही. या कारणास्तव, जीएसटी शुल्क आकारलं जाईल. भारतीय रेल्वेकडून अलीकडेच खाद्यपदार्थांवरील सेवा शुल्क रद्द करण्यात आलं आहे.
हेही वाचा- राकेश झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात 300 कोटींची घट, 'या' शेअरमुळे मोठं नुकसान
AAAR ने सांगितलं की, GST चे दर विविध वस्तूंवर त्यांच्या दरांवर आकारले जातील. याशिवाय, ट्रेनमधील किंवा प्लॅटफॉर्मवरील सेवेनुसार वेगवेगळे GST दर लागू होऊ शकतात. दिपक अँड कंपनी (अपीलकर्ता) यांनी AAAR च्या निर्णयाविरुद्ध अपील केलं. या कंपनीनं राजधानी ट्रेन तसेच मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमधील प्रवाशांना अन्न पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वेशी करार केला आहे.
विशेष म्हणजे, AAAR ने 26 जुलै 2018 रोजीच्या अधिसूचनेची देखील नोंद केली आहे. ज्यात असे नमूद केलं आहे की भारतीय रेल्वे, इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) किंवा त्यांच्या परवानाधारकांद्वारे पुरविल्या जाणार्या खाद्यपदार्थ किंवा पेयांचा पुरवठा - मग ते ट्रेनमध्ये असो किंवा प्लॅटफॉर्मवर, विना इनपुट टॅक्स क्रेडिट 5 टक्के जीएसटीच्या अधीन आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, GST, Indian railway