Home /News /money /

GST Council | महागाई आणखी वाढणार? GST च्या या स्लॅब मध्ये होणार मोठा बदल

GST Council | महागाई आणखी वाढणार? GST च्या या स्लॅब मध्ये होणार मोठा बदल

Latest GST News: सध्या जीएसटीमध्ये चार स्लॅब आहेत. यामध्ये 5, 12, 18 आणि 28 टक्के टॅक्स स्लॅबचा समावेश आहे. सध्या सोने आणि इतर दागिन्यांवर 3 टक्के जीएसटी आहे.

    नवी दिल्ली, 17 एप्रिल : महागाईन सर्वसामान्य हैराण झालेला असताना आता त्यात आणख वाढ होणार असल्याने जगणे कठीण होणार आहे. मे महिन्यात होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या (GST Council) महत्त्वाच्या बैठकीत पाच टक्के टॅक्स स्लॅब हटवण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेतला जाऊ शकतो. राज्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी परिषद हा निर्णय घेऊ शकते. परिषद मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या दैनंदिन वस्तूंसाठी तीन टक्के स्लॅब निश्चित करू शकते. त्याच वेळी, पाच टक्के कर स्लॅब अंतर्गत येणारी इतर उत्पादने आठ टक्के स्लॅबमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात. बहुतेक राज्ये सहमत आहेत पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, हा निर्णय अशा वेळी घेतला जाऊ शकतो जेव्हा बहुतांश राज्ये महसूल वाढवण्यासाठी या निर्णयाच्या बाजूने दिसत आहेत. अहवालानुसार, बहुतेक राज्यांना नुकसान भरपाईच्या रकमेसाठी केंद्र सरकारवर अवलंबून राहायचे नाही. सध्या इतके स्लॅब आहेत सध्या जीएसटीमध्ये चार टॅक्स स्लॅब आहेत. यामध्ये 5, 12, 18 आणि 28 टक्के टॅक्स स्लॅबचा समावेश आहे. सध्या सोने आणि इतर दागिन्यांवर 3 टक्के जीएसटी आहे. याशिवाय Exempt यादीही आहे. यामध्ये ब्रँड नसलेले कपडे आणि पॅक नसलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. यांवर कोणताही कर नाही. Petrol Diesel Prices : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, तपासा एक लीटरचा आजचा भाव Exempt List संबंधित मोठी अपडेट अहवालात सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की महसूल वाढवण्यासाठी, जीएसटी परिषद काही गैर-खाद्य उत्पादनांचा समावेश करमुक्त यादीमध्ये तीन टक्क्यांच्या स्लॅबमध्ये करू शकते. 5% स्लॅब संपेल अहवालानुसार पाच टक्क्यांचा स्लॅब सात, आठ किंवा नऊ टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. यासंदर्भात जीएसटी कौन्सिलने अंतिम निर्णय घ्यायचा आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांचे अर्थमंत्री जीएसटी कौन्सिलमध्ये समाविष्ट आहेत. राज्य सरकारांना मोठा फायदा होईल पॅकबंद खाद्यपदार्थ प्रामुख्याने पाच टक्के टॅक्स स्लॅबमध्ये येतात. पाच टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये प्रत्येक एक टक्का वाढ झाल्याने जीएसटी संकलन सुमारे 50,000 कोटी रुपयांनी वाढेल. 8% स्लॅब तयार होईल जीएसटी कौन्सिल (GST Council) आता पाच टक्क्यांच्या स्लॅबमध्ये समाविष्ट असलेल्या बहुतांश वस्तूंचा आठ टक्क्यांच्या नवीन स्लॅबमध्ये समावेश करू शकते. अहवालानुसार, इतर अनेक पर्यायांवरही विचार केला जात आहे. महागाई आणखी वाढणार का? जीएसटीबाबत हे अपडेट अशा वेळी आले आहे जेव्हा मार्चमध्येही देशातील किरकोळ महागाईचा दर आरबीआयच्या लक्ष्य श्रेणीपेक्षा जास्त होता. पेट्रोल, डिझेलसोबतच पीएनजी आणि सीएनजीच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत जीएसटी स्लॅबमधील या बदलाचा वस्तूंच्या किमतींवर कसा परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: GST

    पुढील बातम्या