मराठी बातम्या /बातम्या /मनी /GST मुळे हॉस्पिटलच्या खोली भाड्यात वाढ; हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियमही वाढणार?

GST मुळे हॉस्पिटलच्या खोली भाड्यात वाढ; हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियमही वाढणार?

GST Effect: पॉलिसीधारकाच्या दृष्टिकोनातून या GSTचा परिणाम अधिक प्रीमियम देखील होईल कारण खोलीचे भाडे रुग्णालयाच्या एकूण बिलाच्या 15-20 टक्के आहे.

GST Effect: पॉलिसीधारकाच्या दृष्टिकोनातून या GSTचा परिणाम अधिक प्रीमियम देखील होईल कारण खोलीचे भाडे रुग्णालयाच्या एकूण बिलाच्या 15-20 टक्के आहे.

GST Effect: पॉलिसीधारकाच्या दृष्टिकोनातून या GSTचा परिणाम अधिक प्रीमियम देखील होईल कारण खोलीचे भाडे रुग्णालयाच्या एकूण बिलाच्या 15-20 टक्के आहे.

मुंबई, 23 जुलै : जीएसटी बदलामुळे अनेक वस्तूचे दर वाढले आहे. आहे. रुग्णालयातील खोल्यांवर देखील 5 टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे. हा जीएसटी आयसीयू वगळता 5000 रुपयांपेक्षा जास्त भाडे असलेल्या खोल्यांवर लावला जाईल. जर तुमच्याकडे आरोग्य विमा पॉलिसी असेल आणि त्यात खोलीच्या भाड्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल. तुमच्या हॉस्पिटलचे बिल वाढेल की नाही?

तज्ञांच्या मते, आरोग्य विमा कंपन्या या कराचा एकूण बिलाच्या रकमेचा भाग म्हणून विचार करू शकतात, परंतु ज्या पॉलिसीधारकांनी खोलीच्या भाड्याच्या सब लिमिटची योजना आखली आहे त्यांना याचा फटका बसू शकतो. या करामुळे विमाधारकावर आर्थिक बोजा वाढू शकतो.

विम्याचा हप्ता आणखी वाढू शकतो

सर्व आरोग्य विम्याचा प्रीमियम सर्व वयोगटांसाठी आणखी वाढू शकतो. ACKO इन्शुरन्सचे बिरेश गिरी म्हणतात की, पॉलिसीधारकाच्या दृष्टिकोनातून या GSTचा परिणाम अधिक प्रीमियम देखील होईल कारण खोलीचे भाडे रुग्णालयाच्या एकूण बिलाच्या 15-20 टक्के आहे.

प्रीमियममध्ये 2-3% वाढ अपेक्षित आहे

तज्ज्ञांच्या मते, विमा कंपन्या पॉलिसीच्या प्रीमियममध्ये लगेच वाढ करणार नाहीत. भविष्यात, प्रोडक्ट्सच्या रिफायलिंगमध्ये, विमा कंपन्या प्रीमियममध्ये 2-3 टक्क्यांनी वाढ करू शकतात. आरोग्य विमा प्रीमियमवर वेगळा 18% GST लागू आहे. हे पाहता विमा कंपन्यांनाही त्यांच्या हॉस्पिटल पॅकेजमध्ये बदल करावे लागतील. या करामुळे रुग्णालयाच्या खुल्या खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे वाढीव क्लेम्सनंतर विमा कंपन्याही त्यांच्या प्रीमियममध्ये वाढ करतील.

पॉलिसी महाग होईल

MediaAssist TPA कंपनीचे सीईओ सतीश गिदुगु म्हणतात की पूर्वीची आरोग्यसेवा GST च्या कक्षेबाहेर होती. रुग्णालयाच्या खोलीच्या भाड्यावर 5 टक्के आकारणी केल्यास ज्या पॉलिसीधारकांच्या आरोग्य विमा पॉलिसी आहेत त्यांच्यासाठी रुग्णालयातील निवासाचा खर्च वाढेल ज्यांच्याकडे खोलीच्या भाड्याच्या उप-मर्यादा आहेत.

First published:
top videos

    Tags: GST, Health Tips, Money