दूध, न्यूज पेपर, चिकन या वस्तूंवर नाही GST, इथे वाचा पूर्ण यादी

दूध, न्यूज पेपर, चिकन या वस्तूंवर नाही GST, इथे वाचा पूर्ण यादी

आज GST म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स कौन्सिलची एक महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीत GST ची वसुली वाढवण्यासाठी वेगवेगळ्या उपायांवर विचार केला जाईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 डिसेंबर : आज GST म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स कौन्सिलची एक महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीत GST ची वसुली वाढवण्यासाठी वेगवेगळ्या उपायांवर विचार केला जाईल.

GST मध्ये सध्या 4 टॅक्स स्लॅब आहेत. 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के, 28 टक्के असे हे 4 स्लॅब आहेत. यामध्ये एक नजर टाकूया.

दूध, दही, पनीर

दैनंदिन जीवनात लागणाऱ्या काही वस्तू GST च्या चौकटीबाहेर ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये ताक, भाज्या, फळं, ब्रेड, धान्य, गूळ, दूध, अंडी, दही, लस्सी, पॅक न केलेलं पनीर, अनब्रँडेड आटा, अनब्रँडेड मैदा, अनब्रँडेड बेसन, प्रसाद, काजळ, मीठ अशा वस्तू यामध्ये आहेत. त्याशिवाय ताजं मांस, मासे, चिकन यावरही GST नाही.

मुलांचं शैक्षणिक साहित्य आणि न्यूज पेपर

मुलांची ड्रॉइंग आणि कलरिंगची पुस्तकं त्याचबरोबर शैक्षणिक सेवांवरही GST नाही. याशिवाय मातीच्या मूर्ती, न्यूज पेपर, खादी स्टोअरमधले खादीचे कपडे यावरही कोणताही कर नाही.

हेल्थ सर्व्हिसेस

सरकारने हेल्थ सर्व्हिसेसवरही शून्य टक्के GST आहे. सॅनिटरी नॅपकिन्स, स्टोन, मार्बल, राखी, लाकडाच्या मूर्ती आणि हँडिक्राफ्टच्या वस्तूही GST च्या कक्षेबाहेर आहेत. आर्थिक मंदीवर उपाय काढण्यासाठी GST ची वसुली वाढवण्यावर सरकार भर देणार आहे. त्याचबरोबर GST ची अमलबजावणी अधिक प्रभावी पद्धतीने व्हावी यासाठीही सरकारचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, केरळ यासारख्या राज्यांनी GST च्या नुकसान भरपाईपोटी केंद्राकडे मदतही मागितली आहे. या सगळ्याच मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल.

(हेही वाचा : सायरस मिस्री यांची हकालपट्टी बेकायदेशीर, टाटा समूहाला मोठा धक्का)

======================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: GSTmoney
First Published: Dec 18, 2019 05:16 PM IST

ताज्या बातम्या