मोबाइल खरेदी महागणार, GST परिषदेमध्ये झाला महत्त्वाचा निर्णय

बाजारात एकाहून एक स्मार्टफोन उपलब्ध आहेत. कमीत कमी किंमतीपासून ते महागड्या किंमतीपर्यंतचे स्मार्टफोन तुम्हाला मिळू शकतात. मात्र, अनेकदा महागडा फोन आवडतो पण तो बजेटच्या बाहेर असतो. अशावेळी सेकेण्ड हॅण्ड फोनचाच पर्याय समोर उरतो.

शनिवारी पार पडलेल्या जीएसटी परिषदे (GST Council) मध्ये काही महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. जर तुम्ही मोबाइल खरेदीच्या विचारात असाल, तर ही खरेदी तुम्हाला महागात पडण्याची शक्यता आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 14 मार्च : शनिवारी पार पडलेल्या जीएसटी परिषदे (GST Council) मध्ये काही महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. जीएसटी परिषदने शनिवारी घेतलेल्या बैठकीत असा निर्णय घेतला आहे की फर्टिलायजर्स आणि चपलांवर लागणाऱ्या जीएसटी दरांमध्ये (GST Rates) कोणताही बदल होणार नाही आहे. त्याचप्रमाणे टेक्सटाइल आयटम्सवरील दर बदलण्याचा प्रस्ताव देखील नाकारण्यात आला आहे. मात्र सर्वसामान्यांच्या रोजच्या जीनवातील वस्तू म्हणजे मोबाइल फोनवर असणाऱ्या जीएसटी दरात वाढ होणार आहे. नवीन मोबाइल घेण्याच्या विचारात असाल मोबाइल काहीशा महाग दरामध्ये तुम्हाला खरेदी करावा लागेल. मोबाइल फोन्सवर असणारा जीएसटी फीसदी टक्क्यांनी वाढून 18 टक्के करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जीएसटी परिषदेच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे की, B2B सप्लाय आणि एक्सपोर्टसाठी GSTR-1 फॉर्म भरणं अनिवार्य असेल.जीएसटी परिषदेची 39 वी बैठक आज पार पडली. या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबरोबरच काही राज्यांचे अर्थमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामाबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे घरगुती मेंटेनन्स, रिपेअर आणि ओव्हरहॉल सर्व्हिस प्रोव्हायडर्सना सुद्धा या बैठकीत दिलासा देण्यात आला. जीएसटी नेटवर्क पोर्टलमधील त्रुटींबाबत महत्त्वाची चर्चा त्याचप्रमाणे जीएसटी नेटवर्क पोर्टलमध्ये असणाऱ्या त्रुटींवर इन्फोसिसचे नंदन निलकेणी यांनी सविस्तर प्रेझेंटेशन दिलं. निलकेणी यांनी आश्वासन दिलं आहे की जानेवारी 2021 पर्यंत GSTN मधील सर्व त्रुटी दूर करण्यात येतील.
    First published: