• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • जुलैमध्ये जीएसटी कलेक्शनमध्ये बंपर वाढ! 1.16 लाख कोटींपेक्षा जास्त आहे GST Collection

जुलैमध्ये जीएसटी कलेक्शनमध्ये बंपर वाढ! 1.16 लाख कोटींपेक्षा जास्त आहे GST Collection

July GST Collections: जुलै महिन्यात जीएसटी कलेक्शन 1,16,393 कोटी रुपये आहे. जे गेल्यावर्षी याच महिन्यातील कलेक्शनपेक्षा 33 टक्के जास्त आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 01 ऑगस्ट: अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) रविवारी अशी माहिती दिली आहे की, जुलै महिन्यात जीएसटी कलेक्शन 1,16,393 कोटी रुपये आहे. जे गेल्यावर्षी याच महिन्यातील कलेक्शनपेक्षा 33 टक्के जास्त आहे. यामध्ये CGST 22,197 कोटी रुपये, SGST 28,541 कोटी रुपये आणि IGST 57,864 कोटी रुपये आहे. IGST मध्ये 57,900 कोटी रुपये इंपोर्टच्या माध्यमातून आले आहेत. सेस (Cess) मधून 7,790 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. यामध्ये 815 कोटी रुपये इंपोर्टेड गुड्सवर लागणाऱ्या सेसमधून आले आहेत. गेल्यावर्षी याच महिन्यातील कलेक्शनपेक्षा जुलै 2021 मधील कलेक्शन 33 टक्के जास्त आहे. जुलैमध्ये वस्तूंच्या आयातीतून आलेला महसूल गेल्यावर्षीच्या समान महिन्याच्या तुलनेत 36 टक्के अधिक आहे. तर देशांतर्गत कलेक्शन (including import of services) सह 32 टक्के जास्त आहे. हे वाचा-ICICI बँकेच्या ग्राहकांना झटका! आजपासून या सुविधांसाठी द्यावं लागणार जास्त शुल्क जीएसटीचं हे कलेक्शन 1 जुलै 2021 ते 31 जुलै 2021 दरम्यान GSTR-3B फायलिंगच्या माध्यमातून झाले आहे. याशिवाय इम्पोर्टेड गुड्सवर वसूल करण्यात आलेल्या IGST आणि सेसला देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये जीएसटी कलेक्शन 1,16,293 कोटी आहे. जे जूनच्या तुलनेतही अधिक आहे. सलग आठ महिन्यासाठी जीएसटी कलेक्शन 1 लाख कोटींपेक्षा जास्त होतं. मात्र जूनमध्ये हे कलेक्शन एक लाख कोटींपेक्षा कमी झालं होतं. जून महिन्यात जीएसटी कलेक्शन 92,849 कोटी इतकं होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता पुन्हा एकदा बाजार धीम्या गतीने उघडण्यास सुरुवात झाली आहे. ज्याचा परिणाम जीएसटी कलेक्शनमध्ये पाहायला मिळतो आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: