नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : ऑक्टोबर 2021 महिन्यात जीएसटी (October 2021 GST Collection) अर्थात वस्तू आणि सेवा करापोटी एकूण 1,30,127 कोटी रुपये महसूल संकलित करण्यात आला आहे. जीएसटी सुरु झाल्यानंतरचं आजवरचं हे दुसरं सर्वाधिक कलेक्शन आहे. त्यापैकी सीजीएसटी (CGST) अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 23,861 कोटी रुपये, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 30,421 कोटी रुपये, आयजीएसटी 67,361 कोटी रुपये यांचा समावेश आहे.
सरकारने (Central Government) नियमित तडजोड म्हणून आयजीएसटीमधून 27,310 कोटी रुपये सीजीएसटीला आणि 22,394 कोटी रुपये एसजीएसटीला दिले आहेत. सर्व देणी दिल्यानंतर, ऑक्टोबर 2021 या महिन्यात केंद्र आणि राज्य सरकारांना सीजीएसटीपोटी 51,171 कोटी रुपये आणि एसजीएसटीपोटी 52,815 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे.
Share Market Update : सेन्सेक्स 832 तर निफ्टीत 258 अंकांनी वाढ; IT, बँकिंग स्टॉक तेजीत
गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात संकलित झालेल्या जीएसटी महसुलापेक्षा ऑक्टोबर 2021 मध्ये 24 टक्के अधिक तर 2019-20 पेक्षा 36 टक्के अधिक महसूल संकलित झाला आहे. या महिन्यात आयात केलेल्या वस्तूंवरील करापोटी 39 टक्के अधिक महसूल जमा झाला असून देशांतर्गत व्यवहारांमधून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल याच स्त्रोतांद्वारे गेल्या वर्षी याच महिन्यात संकलित महसुलापेक्षा 19 टक्के अधिक राहिला.
दिवाळीआधी महागाईचा जोरजार झटका, 268 रुपयांनी महागला कमर्शियल LPG Gas Cylinder
ऑक्टोबरमधील जीएसटी महसूल हा जीएसटीची अंमलबजावणी सुरु झाल्यापासूनचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक महसूल आहे. एप्रिल 2021 मध्ये सर्वोच्च महसूल संकलित झाला होता जो वर्षअखेर महसुलाशी संबंधित होता. अर्थव्यवस्था सुधारत असल्याच्या कलाशी हे सुसंगत आहे. दुसऱ्या लाटेपासून दरमहा तयार होणाऱ्या ई-वे बिलांच्या कलावरून देखील हे स्पष्ट होते. सेमी-कंडक्टर्सच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्याने कार आणि इतर उत्पादनांच्या विक्रीवर परिणाम झाला नसता तर महसूल आणखी वाढला असता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.