मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PM Mudra Yojna अंतर्गत 1999 रुपये जमा करुन 10 लाख लोन मिळवा; वाचा सविस्तर...

PM Mudra Yojna अंतर्गत 1999 रुपये जमा करुन 10 लाख लोन मिळवा; वाचा सविस्तर...

मुद्रा योजनेअंतर्गत (PM Mudra Yojna) हमीशिवाय कर्ज उपलब्ध आहे. याशिवाय या कर्जासाठी सरकारकडून कोणतेही प्रोसेसिंग चार्ज घेतले जात नाही.

मुद्रा योजनेअंतर्गत (PM Mudra Yojna) हमीशिवाय कर्ज उपलब्ध आहे. याशिवाय या कर्जासाठी सरकारकडून कोणतेही प्रोसेसिंग चार्ज घेतले जात नाही.

मुद्रा योजनेअंतर्गत (PM Mudra Yojna) हमीशिवाय कर्ज उपलब्ध आहे. याशिवाय या कर्जासाठी सरकारकडून कोणतेही प्रोसेसिंग चार्ज घेतले जात नाही.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 31 ऑक्टोबर : केंद्र सरकारने लहान उद्योग सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना (PM Mudra Yojna) सुरू केली आहे. या अंतर्गत लोकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अल्प प्रमाणात कर्ज दिले जाते. आता काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की सरकार फक्त 1999 रुपये जमा केल्यावर 10 लाखांपर्यंत कर्ज देत आहे. या व्हायरल मेसेजचे (Viral Message) सत्य काय आहे जाणून घेऊया.

व्हायरल मेसेजचे सत्य काय?

व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये (Viral Message) असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकार मुद्रा योजनेंतर्गत 1999 रुपयांचे इंटरनेट बँकिंग शुल्क (Internet Banking Fees) जमा केल्यावर 2 टक्के व्याजदराने कर्ज देत आहे.

मेसेज खोटा असल्याचा सरकारचं स्पष्टीकरण

पीआयबी फॅक्ट चेकने ट्वीट करून या मेसेजची सत्यता सांगितली आहे. पीआयबीने आपल्या ट्विटरवरून इशारा दिला आहे की, प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत असे कोणतेही पत्र जारी करण्यात आलेले नाही. हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे.

याला म्हणतात LUCK! पठ्ठ्याला लागला Jackpot; खरेदी केलेल्या वीसच्या वीस Lottery एकाच वेळी जिंकला

पीएम मुद्रा योजना काय आहे?

मुद्रा योजनेअंतर्गत हमीशिवाय कर्ज उपलब्ध आहे. याशिवाय या कर्जासाठी सरकारकडून कोणतेही प्रोसेसिंग चार्ज घेतले जात नाही. मुद्रा योजनेतील कर्ज परतफेडीचा कालावधी पाच वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. योजनेअंतर्गत कोणतेही निश्चित व्याजदर नाहीत. मुद्रा कर्जासाठी वेगवेगळ्या बँका वेगवेगळे व्याजदर आकारू शकतात. साधारणपणे किमान व्याज दर 12 टक्के असतो.

साफसफाई करताना महिलेला कचऱ्यात सापडला चमकणारा दगड; किंमत ऐकताच बसला धक्का

योजनेत 3 प्रकारच्या कर्जांचा समावेश

1. शिशु कर्ज : 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज शिशू कर्ज अंतर्गत दिले जाते.

2. किशोर कर्ज : किशोर कर्जाअंतर्गत 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

3. तरुण कर्ज : तरुण कर्ज अंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

First published:

Tags: Investment, Loan, Money