मुंबई, 29 नोव्हेंबर: 1 डिसेंबर 2020 पासून देशामधील अनेक नियम बदलणार आहेत. ज्यांचा थेट परिणाम तुमच्या आमच्या आयुष्यावर होणार आहे. तुमच्या घरातील सिलेंडरपासून ते RTGSच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. नक्की कोणते नियम बदलणार आहेत हे जाणून घेणं आवश्यक आहे.
आठवड्याचे सातही दिवस RTGSचा लाभ
RTGS म्हणजे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (The term real-time gross settlement ) या सुविधेचा लाभ आठवड्याचे सातही दिवस घेता येणार आहे. ग्राहकांना वर्षाचे 365 दिवस 24 तास या सुविधेचा लाभ घेता आहे. RBI चं म्हणणं आहे की, ही सुविधा सुरू झाल्यावर भारत जगातील अशा मोजक्या देशांपैकी एक होईल ज्यांच्याकडे 24x7x365 मोठ्या मूल्याची रिअल टाइम पेमेंट सिस्टीम आहे.
RTGS म्हणजे काय?
रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंटमुळे ग्राहकांना त्वरित पैसे ट्रान्सफर करता येतात. मोठ्या रकमेसाठी याचा वापर केला जातो. सगळ्या बँकांमध्ये जास्तीत जास्त पैसे टान्सफर करण्याची मर्यादा वेगवेगळी आहे. ऑनलाइन आणि बँक शाखांमधूनही या सुविधेचा वापर करता येतो. (NEFT)ने याबाबत आधीच नियमात बदल केले आहेत. NEFT मार्फत हस्तांतरित केलेल्या निधीसाठी कोणतीही किमान मर्यादा नाही, तर जास्तीत जास्त पैसे टान्सफर करण्याची मर्यादा एका बँकेतून दुसर्या बँकेत वेगवेगळी असू शकते. यासाठी काही बँकांमध्ये कमाल मर्यादा नाही.
1 डिसेंबरपासून नव्या ट्रेन्स धावणार
आता 1 डिसेंबरपासून काही गाडया सुरू होणार आहेत. यात झेलम एक्स्प्रेस आणि पंजाब मेलचा समावेश आहे. लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या पुणे-जम्मूतवी पुणे झेलम स्पेशल आणि मुंबई फिरोजपूर पंजाब मेल स्पेशल दररोज धावतील.
विमा पॉलिसीमध्ये बदल
काही वेळा आपल्याला विमा पॉलिसीचा हफ्ता भरता येत नाहीत. अशा वेळी त्या बंद होतात. परंतु नव्या धोरणानुसार, 5 वर्षांनंतर विमा घेणाऱ्या व्यक्तीला प्रीमियममध्ये 50 % कपात करता येईल. हफ्ता कमी झाल्यामुळे त्यांना ही रक्कम भरणं सहज शक्य होईल.
PNB ने ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात केले बदल
पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी ही महत्वाची बातमी आहे कारण, बँकेने 1 डिसेंबरपासून OTP पासवर्डद्वारे ATM मधून पैसे काढण्याची सुविधा सुरू केली आहे. रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत ग्राहकांना 10,000 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार आहे. ही सुविधा फक्त नाइट अवर्ससाठीच आहे. यासाठी ग्राहकांना ओटीपीचा वापर करावा लागेल.
गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल
नोव्हेंबर महिन्यात गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली होती. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला या किंमती निश्चित केल्या जातात. त्यामुळे डिसेंबर महिन्यात गॅसच्या किंमती वाढणार की कमी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gas, Reserve bank of india