• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • ‘किसान विकास’चे 3 हजार कोटी अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात, 42 लाख शेतकऱ्यांकडून मोदी सरकार करणार वसुली

‘किसान विकास’चे 3 हजार कोटी अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात, 42 लाख शेतकऱ्यांकडून मोदी सरकार करणार वसुली

केंद्र सरकारने (Central government) गरीब शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या किसान विकास योजनेअंतर्गत (PM Kisan scheme) वाटप केलेल्या पैशांचा लाभ हा अनेक अपात्र शेतकऱ्यांनी (non eligible farmers) घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 20 जुलै: केंद्र सरकारने (Central government) गरीब शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या किसान विकास योजनेअंतर्गत (PM Kisan scheme) वाटप केलेल्या पैशांचा लाभ हा अनेक अपात्र शेतकऱ्यांनी (non eligible farmers) घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. केंद्र सरकारनं संसदेत (Winter session) ही माहिती जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत एकूण 42 लाख (42 lakh) अपात्र शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यांच्या खात्यावर आतापर्यंत 3 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. आता सरकारनं हे पैसे परत मिळवण्यासाठी पावलं टाकायला सुरुवात केली आहे. काय आहे योजना? केंद्र सरकारच्या किसान विकास योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6 हजार रुपये देण्यात येतात. वर्षातून तीन हफ्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. मात्र या योजनेला पात्र ठरणारा शेतकरी हा करदाता नसावा, ही प्रमुख अट आहे. जो करदाता असेल, तो शेतकरी गरीब मानला जात नाही. पूर्णवेळ शेती करणारा आणि शेतीवरच उपजिवीका अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेसाठी ग्राह्य धरले जाते. अपात्र शेतकऱ्यांकडून वसुली करणार अनेक करदात्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी आपलं नाव नोंदवलं असून त्यांच्या नावावर रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र अशा प्रकारे करदात्या शेतकऱ्यांना पैसे देणं, हे एकप्रकारे खऱ्या लाभार्थींना त्यापासून वंचित ठेवणं ठरेल, असं सांगत अपात्र शेतकऱ्यांना पैसे परत देण्याचं आवाहन सरकारनं केलंय. त्यासाठी अशा सर्व अपात्र शेतकऱ्यांना सरकारनं नोटिसा पाठवल्या असून खात्यावर जमा झालेले पैसे परत करण्याचं आवाहन केलं आहे. हे वाचा -LIVE: कॉंग्रेसचं अस्तित्व संपत चाललंय, पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल कुठल्या राज्यात किती शेतकरी या योजनेतून पैसे मिळालेल्या अपात्र शेतकऱ्यांचं सर्वाधिक प्रमाण आसाममध्ये आहे. आसामामध्ये 8 लाख 35 हजार शेतकऱ्यांच्या नावे 554 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. तमिळनाडूनत 7 लाख 22 हजार शेतकऱ्यांच्या नावे 340 कोटी रुपये, पंजाबमध्ये 5 लाख 62 हजार शेतकऱ्यांच्या नावे 437 कोटी रुपये तर महाराष्ट्रात 4 लाख 45 हजार शेतकऱ्यांच्या नावे 358  कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. हे पैसे आता सरकार परत घेणार आहे.
  Published by:desk news
  First published: