मराठी बातम्या /बातम्या /मनी /

LPG Cylinder: LPG ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत केंद्र सरकार, असा आहे प्लॅन

LPG Cylinder: LPG ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत केंद्र सरकार, असा आहे प्लॅन

एलपीजी गॅस सिलेंडरच्या वजनामुळे काहींसाठी सिलेंडर बदलण्याची प्रक्रिया कठीण होऊन जाते. अशा व्यक्तींना येणाऱ्या काळात दिलासा मिळू शकतो. केंद्र सरकार घरगुती एलपीजी सिलिंडरचे वजन कमी (LPG gas cylinder weight) करण्याच्या तयारीत आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 07 डिसेंबर: एलपीजी गॅस सिलेंडरच्या वजनामुळे काहींसाठी सिलेंडर बदलण्याची प्रक्रिया कठीण होऊन जाते. अशा व्यक्तींना येणाऱ्या काळात दिलासा मिळू शकतो. केंद्र सरकार घरगुती एलपीजी सिलिंडरचे वजन कमी (LPG gas cylinder weight) करण्याच्या तयारीत आहे. 14.2 किलो वजनाचे गॅस सिलेंडर (एलपीजी ग्राहक) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना महिलांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सरकार त्याचे वजन कमी करण्यासह विविध पर्यायांवर विचार करत आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पूरक प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती दिली. यापूर्वी एका सदस्याने सिलेंडर जड असल्याने महिलांना होणाऱ्या त्रासाचा उल्लेख केला होता.

महिलांना येणार नाहीत समस्या

याला उत्तर देताना पुरी म्हणाले की, महिला आणि मुलींना सिलेंडरचे वजन सहन करावे लागेल अशी आमची इच्छा नाही आणि त्याचे वजन कमी करण्याचा विचार केला जात आहे. ते असं म्हणाले होते की आम्ही एक मार्ग काढू, सिलेंडरचे 14.2 किलो वजन 5 किलोपर्यंत कमी करण्याचा किंवा अन्य कोणताही मार्ग काढला जाईल, आम्ही त्याकरता कटिबद्ध आहोत.

हे वाचा-मोदी सरकारच्या मदतीने सुरू करा हा व्यवसाय, होईल 50000 रुपयांचा थेट नफा

सब्सिडीबाबत काय आहे सरकारची योजना?पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलिंडरवर (LPG Gas Cylinder Subsidy) सब्सिडी दिली जात आहे. अनुदानाचे पैसे ग्राहकांच्या खात्यावर ट्रान्सफर केले जात आहेत. माहितीनुसार, आता एलपीजी गॅस ग्राहकांना 79.26 रुपये प्रति सिलिंडर सब्सिडी म्हणून देण्यात येत आहे. दरम्यान काही ग्राहकांना 158.52 रुपये किंवा 237.78 सब्सिडी मिळत आहे. मात्र अद्यापही याबाबत संभ्रम कायम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या खात्यात अनुदान दिले जात नसल्याची प्रकरणे समोर आली होती. मात्र, आता तक्रारी येणे बंद झाले आहे.

अशाप्रकारे तपासा स्टेटस

>> http://mylpg.in/ वर जा आणि तुमचा LPG आयडी टाका.

>> तुम्ही वापरत असलेल्या OMC LPG च्या आधारावर तुम्हाला आवश्यक माहिती द्यावी लागेल.

>> तुमचा 17 अंकी LPG आयडी एंटर करा आणि मोबाईल नंबर नोंदवा.

>> आता कॅप्चा कोड टाका आणि proceed वर क्लिक करा

>> तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल.

हे वाचा-म्युच्युअल फंडाची नवीन योजना, अवघ्या 100 रुपयांपासून सुरू करा

>> आता तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकून पासवर्ड तयार करावा लागेल

>> यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर एक लिंक मिळेल. तुमच्या मेलवर जाऊन तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करावे लागेल.

>> आता mylpg.in खात्यावर लॉग इन करा आणि पॉप-अप संदेशामध्ये तुमचा तपशील प्रविष्ट करा.

>> याठिकाणी तुम्ही सिलेंडर बुकिंग हिस्ट्री/सब्सिडी ट्रान्सफर या हे पर्याय तपासून सब्सिडीचे स्टेटस पाहू शकता.

First published:

Tags: LPG Price