मुंबई, 13 जुलै : सरकार ग्रामीण आणि आदिवासी भागात रोजगार वाढवण्यासाठी प्रोत्साहन देतंय. खादी ग्रामोद्योग आयोग (KVIC )नं गेल्या दोन वर्षात शेतकरी, बेरोजगार तरुण यांना मधमाशी पालनासाठी एक लाखापेक्षा जास्त बाॅक्सेस दिले होते. आयोगानं हे हनी मशीनद्वारे केलंय. तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही एक चांगली संधी आहे. तुम्ही हनी हाउस आणि मध निर्मिती करायचा प्लान्ट सुरू करू शकता.
काय आहे हनी मशीन?
खादी ग्रामोद्योग विभागानं हनी मशीन योजना सुरू केलीय. याद्वारे शेतकरी आणि पैसे कमवायची इच्छा असणारे हा व्यवसाय सुरू करून मोठी कमाई करू शकतात. या माध्यमातून मध काढताना मधमाशा मरत नाहीत. हा रोजगार बऱ्याच जणांनी सुरू केलाय.
नवोदय विद्यालय समितीत कमवू शकता 2 लाख रुपये, 2300पदांवर आहे भरती
सरकार देते पाठिंबा
तुम्ही या योजनेअंतर्गत हनी प्रोसेसिंग प्लँट लावू इच्छिता तर कमिशनकडून तुम्हाला 65 टक्के कर्ज मिळतं. खादी ग्रामोद्याग तुम्हाला 25 टक्के सबसिडी देतं. म्हणजे तुम्हाला फक्त 10 टक्के पैसे गुंतवावे लागतात.
खूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण, 'हे' आहेत नवे दर
किती रुपयांत सुरू होईल व्यवसाय?
KVIC नं सांगितल्याप्रमाणे तुम्ही 20 हजार किलोग्रॅम वर्षाला मध बनवण्याचा प्लँट लावला तर 24.50 लाख रुपये खर्च येईल. यात जवळजवळ 16 लाख रुपयाचं कर्ज मिळू शकतं. मार्जिन मनी म्हणून 6.15 लाख रुपये मिळतील आणि तुम्हाला 2.35 लाख रुपये गुंतवावे लागतील.
Food Delivery देणाऱ्या Swiggy ने पहिल्यांदाच केली तृतीयपंथीयाची नेमणूक
तुम्ही वर्षाला 20 हजार किलोग्रॅम मध तयार करता, त्याची किंमत 250 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. त्यात 4 टक्के तोटा धरला तरी वर्षाला विक्री 48 लाख रुपये होईल. यातला 34.15 ला रुपये होणारा खर्च कमी केला तर तुमची वर्षाची कमाई 13.85 लाख रुपये होईल. म्हणजे महिन्याला तुम्ही 1 लाख रुपये कमाई कराल.
VIDEO: माकडाचा 98 तास मृत्यूशी संघर्ष; अधिकाऱ्यांनी लावली जीवाची बाजी