मराठी बातम्या /बातम्या /मनी /कर बचत आणि जास्तीत जास्त परतावा; गुंतवणुकीसाठी उत्तम अशा सरकारी योजना

कर बचत आणि जास्तीत जास्त परतावा; गुंतवणुकीसाठी उत्तम अशा सरकारी योजना

विवाद से विश्वास या योजनेतंर्गत घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत आहे. प्रलंबित योजनांचं निराकरण करणं हा या योजनेचा उद्देश आहे. सर्व न्यायालयांमध्ये थेट कराशी संबंधित 9.32 लाख कोटी रुपयांचे 4.83 लाख खटले प्रलंबित आहेत. त्यांना व्याज आणि दंडावर पूर्णपणे सूट आहे.

विवाद से विश्वास या योजनेतंर्गत घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत आहे. प्रलंबित योजनांचं निराकरण करणं हा या योजनेचा उद्देश आहे. सर्व न्यायालयांमध्ये थेट कराशी संबंधित 9.32 लाख कोटी रुपयांचे 4.83 लाख खटले प्रलंबित आहेत. त्यांना व्याज आणि दंडावर पूर्णपणे सूट आहे.

या सरकारी गुंतवणूक योजनांमध्ये (government saving schemes) कोणत्याही जोखमीशिवाय तुम्हाला मोठा फायदा होईल.

  नवी दिल्ली, 30 मार्च : सध्या बँकांमधील व्याजाचे (Bank Interest Rates) दर खूपच कमी आहेत आणि शेअर बाजारातील (Stock Market) अस्थिरता वाढली आहे. अशावेळी काही सरकारी योजनांमध्ये (Government Scheme) गुंतवणूक केल्यास ती अधिक लाभदायी ठरू शकेल.

  या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास व्याजदर अधिक असल्याने परतावाही चांगला मिळतो तसंच करही (Tax) वाचवता येतो आणि महत्त्वाचे म्हणजे या योजनांमधील गुंतवणूक अतिशय सुरक्षित असते. त्यामुळं सुरक्षित गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी यात गुंतवणूक करावी असं तज्ज्ञांचा सल्ला आहे.

  सरकारी रोखे (Government Securities) :

  सरकारी सिक्युरिटीजमध्ये ट्रेझरी बिल्स (Treasury Bills) आणि सरकारी कर्ज रोख्यांचा (Government Debt Bonds) समावेश होतो. याची मुदत 91 दिवसांपासून 40 वर्षांपर्यंत असते. आपल्या डिमॅट खात्याद्वारे (Demat Account) याची खरेदी करता येते. यावर मिळणाऱ्या व्याजातून टीडीएस (TDS-Tax Deduction at Source) कपात केली जात नाही.

  एनपीएस (National Pension Scheme)

  पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटीतर्फे (PFRDA) राबवण्यात येणाऱ्या एनपीएस (NPS) अर्थात राष्ट्रीय सेवानिवृत्ती योजनेद्वारे वयाच्या 60 व्या वर्षापासून निवृत्तीवेतन मिळते. यात गुंतवलेल्या रकमेवर कोणताही कर लागत नाही, मात्र यात दरवर्षी मिळणाऱ्या वाढीवर कर बसतो.

  अटल निवृत्तीवेतन योजना (Atal Pension Scheme)

  अटल निवृत्तीवेतन योजना या नावावरूनच ही निवृत्तीवेतन योजना असल्याचे लक्षात येते. 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान वय असणारा कोणीही भारतीय नागरिक यात गुंतवणूक करू शकतो.

  हे वाचा -  Gold Price Today: सोन्याचा दर आणखी घसरला, चांदीही स्वस्त; पाहा आजचा लेटेस्ट रेट

  तुम्ही 18 वर्षांचे असाल आणि वयाच्या 60 व्या वर्षानंतर दरमहा किमान एक हजार रुपये पेन्शन मिळावी अशी अपेक्षा असेल तर आता दरमहा फक्त 42 रुपये जमा करावे लागतील. 5000 रुपये पेन्शन हवी असेल तर दरमहा 210 रुपये भरावे लागतील. या गुंतवणूकीवर प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80सी अंतर्गत कर सवलत मिळते.

  सुवर्णरोखे (Gold Bonds)

  भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) सोव्हरिन गोल्ड बॉंडस (Sovereign Gold Bonds) म्हणजेच सुवर्णरोखे विक्रीसाठी खुले करते. याची खरेदी करताना प्रत्यक्ष सोने खरेदी करताना द्यावी लागणारी घडणावळ वगैरे द्यावी लागत नाही. आपल्या डिमॅट खात्यात हे रोखे ठेवता येतात. यावर टीडीएस कापला जात नाही. मुदत संपल्यानंतर याची विक्री करता येते.

  एनएससी (National Savings Scheme)

  नॅशनल सेव्हिंग्ज स्कीम (NSC)अर्थात राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या योजनेत गुंतवणूक केल्यास तुमचा पैसा वाढतो, सोबतच कर बचतही करता येते. याची मुदत 5 वर्षे असते. याचा व्याजदरही चांगला असतो. या गुंतवणुकीवर 80 सी अंतर्गत दीड लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते.

  सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samruddhi Scheme)

  मुलींचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकारने सुकन्या समृद्धी योजना आणली आहे. यामध्ये दहा वर्षांखालील वयाच्या मुलीच्या नावानं खातं उघडता येते. टपाल कार्यालयात किंवा मोठ्या बँकांमध्ये हे खातं उघडता येतं. किमान 250 रुपयांपासून हे खातं सुरू करता येतं आणि वर्षाला कमाल दीड लाख रुपये यात गुंतवता येतात.

  हे वाचा - PNB ने सुरू केली FD ची नवीन योजना, वाचा किती मिळेल व्याज

  पंतप्रधान जीवनज्योती योजना (PM Jeevan Jyoti Scheme)

  ही एक मुदत विमा योजना असून यामध्ये पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतात. 9 मे 2015 मध्ये मोदी सरकारने ही योजना सुरू केली होती. यामध्ये करसवलतही मिळते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही कर बचतीसह कुटुंबाचं भविष्यही सुरक्षित करू शकता.

  पंतप्रधान वय वंदन योजना ( PMVVY)

  पंतप्रधान वय वंदन योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठीची मासिक पेन्शन योजना असून, भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीद्वारे ती चालवली जाते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना दहा वर्षांसाठी एका निश्चित दरानं दर महा ठराविक रक्कम मिळते. याचा वार्षिक व्याज दर 7.40 टक्के आहे.

  First published:

  Tags: Investment, Money, Scheme