मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Excise Duty : पेट्रोल, डिझेलवर उत्पादन शुल्क लागू करण्याचा निर्णय लांबणीवर

Excise Duty : पेट्रोल, डिझेलवर उत्पादन शुल्क लागू करण्याचा निर्णय लांबणीवर

petrol

petrol

केंद्र सरकारने उद्योगक्षेत्राला दिलासा देत पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त उत्पादन शुल्क आकारण्याबाबतचा निर्णय एक महिन्यासाठी लांबणीवर टाकला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 01 ऑक्टोबर : गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या दरांत सातत्याने वाढ होत आहे. उद्योग क्षेत्रासह सर्वसामान्य नागरिक इंधन दरवाढीमुळे त्रस्त झाले आहेत. इंधन दरवाढीमुळे अन्नधान्य, वस्तू आदींच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे महागाई वाढताना दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उद्योग जगताला दिलासा देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त उत्पादन शुल्काबाबतचा निर्णय महिनाभर पुढे ढकलला आहे. यासोबत मिश्रित नसलेल्या म्हणजे कच्च्या डिझेलवर उत्पादन शुल्क आकारण्याचा निर्णय सहा महिन्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आला आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

केंद्र सरकारने उद्योगक्षेत्राला दिलासा देत पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त उत्पादन शुल्क आकारण्याबाबतचा निर्णय एक महिन्यासाठी लांबणीवर टाकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता प्रतिलिटर दोन रुपये उत्पादन शुल्क लावण्याचा निर्णय एक महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. यासोबतच मिश्रित नसलेल्या डिझेलवर उत्पादन शुल्क आकारण्याचा निर्णय सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे.

RBI Monetary Policy Committee Meet : सलग चौथ्यांदा महागला रेपो रेट, 0.50% वाढ, कर्ज महागले

अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी (30 सप्टेंबर) एका अधिसूचनेत सांगितलं की, पेट्रोल आणि डिझेलवर आता 1 नोव्हेंबर 2022 पासून अतिरिक्त उत्पादन शुल्क आकारलं जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एप्रिल 2022 पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात इथेनॉल आणि बायो-डिझेलचं मिश्रण नसलेल्या पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटर दोन रुपये अतिरिक्त शुल्क लावण्याचा प्रस्ताव मांडला होता. हे शुल्क 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू केलं जाणार होतं, परंतु आता हा निर्णय 1 नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आला आहे.

सध्या उसापासून किंवा अतिरिक्त अन्नधान्यापासून काढलं जाणारं 10 टक्के इथेनॉल हे तेल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न स्त्रोत उपलब्ध करून देण्यासाठी पेट्रोलमध्ये मिसळलं जातं. देशात डिझेलचा सर्वाधिक वापर होतो. परंतु, अखाद्य तेलबियांमधून काढलेल्या बायो-डिझेलचं डिझेलमध्ये केवळ प्रायोगित तत्त्वावर मिश्रण केलं जातं. इंधनात मिश्रणाला सरकारचे प्राधान्य आहे. इंधन मिश्रणाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी, असंबंधित इंधनावर ऑक्टोबर 2022 च्या पहिल्या दिवसापासून प्रतिलिटर 2 रुपये अतिरिक्त भिन्नता उत्पादन शुल्क आकारले जाईल.

Good News : स्मॉल सेविंग स्कीमसाठी केंद्र सरकारने वाढवले व्याजदर

गतवर्षी, सरकारने 2025 पर्यंत महागड्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचं लक्ष्य गाठण्याकरिता वेगाने पावलं उचलली आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला 10 टक्के इथेनॉल मिश्रण साध्य करण्यात आलं होतं. भारत हा जगातील तिसरा सर्वांत मोठा तेल आयात करणारा देश आहे, जो आपली तेलाची 85 टक्क्यांहून अधिक मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशी पुरवठादारांवर अवलंबून आहे.

अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, किरकोळ विक्रीसाठी असलेलं पेट्रोल इथेनॉल किंवा मिथेनॉलमिश्रित नाही. सध्या असलेल्या 1.40 रुपये प्रतिलिटर ऐवजी 1 नोव्हेंबर 2022 पासून प्रतिलिटर 3.40 रुपये मूळ उत्पादन शुल्क लागू करण्यात येईल. दुसरीकडे, इथेनॉलसह डोप केलेले नसलेल्या ब्रॅंडेड पेट्रोलवर सध्याच्या 2.60 रुपयांच्या तुलनेत प्रतिलिटर 4.60 रुपये उत्पादन शुल्क लागू केलं जाईल. डिझेल हे किरकोळ विक्रीसाठी असून त्यात बायोडिझल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनस्पती तेलांपासून बनवलेल्या लॉंग चेन फॅटी अ‍ॅसिडचे अल्काइल एस्टर मिसळलेले नाही. सध्या ब्रॅंडेड डिझेलवर 4.20 रुपये उत्पादन शुल्क आकारले जाते. मात्र यापुढे 6.20 रुपये प्रतिलिटर मूळ उत्पादन शुल्क आकारलं जाईल.

मूळ उत्पादन शुल्काव्यतिरिक्त पेट्रोल आणि डिझेलवर विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क आकारलं जातं. पेट्रोलवर 19.90 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलवर 15.80 रुपये एकूण उत्पादन शुल्क आकारलं जातं. अतिरिक्त शुल्कामुळे तेल कंपन्यांना पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यासाठी अधिक इथेनॉल खरेदी करण्यासाठी आणि कमतरता असलेल्या भागात वाहतुकीकरता रसद व्यवस्था करण्यासाठी प्रवृत्त केले जाईल. मिश्रणासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणानुसार बायो-डिझेल तयार करण्यासाठी देश पायाभूत सुविधांची निर्मिती करू शकेल अशी शक्यता दिसत नाही.

First published:

Tags: Petrol and diesel