खूशखबर! 30 टक्के स्वस्त होतील नवीन कार, सरकार लवकरच लागू करणार ही पॉलिसी

खूशखबर! 30 टक्के स्वस्त होतील नवीन कार, सरकार लवकरच लागू करणार ही पॉलिसी

दीर्घकाळापासून लांबणीवर पडलेली स्क्रॅपेज पॉलिसी (Scrappage Policy) लवकरच लागू केली जाऊ शकते. सरकारने याबाबतची माहिती संसदेत दिली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : दीर्घकाळापासून लांबणीवर पडलेली स्क्रॅपेज पॉलिसी (Scrappage Policy) लवकरच लागू केली जाऊ शकते. सरकारने याबाबतची माहिती संसदेत दिली आहे. शनिवारी वाहन स्क्रॅपिंग पॉलिसीसाठी कॅबिनेट नोट तयार करण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग (Minister of State for Road Transport and Highways V K Singh told the Rajya Sabha)  यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले की, अपात्र व जुनी वाहने हटविण्याच्या नव्या धोरणाची कॅबिनेट नोट तयार केली गेली आहे.

दरम्यान असा विश्वास व्यक्त केला जात आहे की स्क्रॅपेज पॉलिसीच्या अंमलबजावणीमुळे सुस्तपणा आणि घसरणीचा सामना करत असलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. नवीन वाहनांची मागणी वाढल्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्राला वेग येईल. ग्राहकांना 30 टक्के स्वस्त नवीन वाहने मिळतील. जुन्या वाहनांमुळे 25 टक्के वायू प्रदूषण कमी होईल. त्याचबरोबर भंगार केंद्रांवर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील.

नवीन कारची नोंदणी विनामूल्य असेल

जुन्या कारला स्क्रॅपेज केंद्रावर विक्री केल्यावर एक प्रमाणपत्र देण्यात येईल.  ते दाखवून नवीन कार खरेदीदारांची कार नोंदणी विनामूल्य केली जाईल. मीडिया रिपोर्टनुसार या निर्णयाद्वारे सुमारे 2.80 कोटी वाहने स्क्रॅपेज पॉलिसीअंतर्गत येतील.

(हे वाचा-कोणत्याही शुल्काशिवाय Paytm वॉलेटमधून बँक खात्यात ट्रान्सफर करा पैसे)

या धोरणामुळे प्रमाणात कबाड केंद्रे बांधली जातील. ज्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्याचबरोबर ऑटोमोबाईल क्षेत्राला स्टील, अ‍ॅल्युमिनियम, प्लास्टिकसारखे भाग स्वस्त रीसायकलिंगमध्ये मिळू शकतील.

(हे वाचा-या योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख)

स्क्रॅपेज पॉलिसी अर्थव्यवस्थेसाठी उपयुक्त ठरेल, वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार लवकरच स्क्रॅपेज पॉलिसी लवकरच कॅबिनेटकडे पाठविली जाईल. त्याठिकाणी मान्यता मिळाल्यानंतर ही पॉलिसी राबवण्याची प्रक्रिया सुरू होईल. बर्‍याच माध्यमांच्या वृत्तांत असे सांगितले आहे की सध्याच्या पँडेमिक काळात स्क्रॅपेज पॉलिसी अर्थव्यवस्थेसाठी उपयुक्त ठरेल.

तुमच्या जुन्या गाड्यांचे काय होईल?

15 वर्ष जुन्या वाहनांना रस्त्यांवरून काढून टाकण्याची तरतूद स्क्रॅपेज पॉलिसीत केली गेली आहे. अशा गाड्या चालविण्यासाठी दरवर्षी फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागेल. यासह रजिस्ट्रेशन रिन्यू करण्यासाठी फी दोन ते तीन पट करण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांन जुन्या वाहनांची विक्री करुन नवीन वाहने खरेदी करण्यास आकर्षित होतील.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 19, 2020, 4:22 PM IST
Tags: vehicle

ताज्या बातम्या