सर्वसामान्यांना फटका! पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार; आता हे आहे कारण

सर्वसामान्यांना फटका! पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार; आता हे आहे कारण

मे 2014 मध्ये पेट्रोलवर एकूण टॅक्स 9.48 रुपये प्रति लीटर आणि डिझेलवर 3.56 रुपये प्रति लीटर होता. तेव्हापासून आतापर्यंत पेट्रोलवरील टॅक्स वाढून 32.98 प्रति लीटर आणि डिझेलवरील टॅक्स 31.83 रुपये प्रति लीटर झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : सर्वसामान्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार (Government of India) पुन्हा एका पेट्रोल-डिझेलवर एक्साइज ड्यूटी (Petrol Diesel Excise Duty) वाढवण्याच्या तयारीत आहे. 3 ते 6 रुपये प्रति लीटरपर्यंत एक्साइज ड्यूटी वाढवली जाण्याची शक्यता आहे.

यापूर्वी सरकारने मे महिन्याच्या दरम्यान, पेट्रोलवर 10 रुपये प्रति लीटर आणि डिझेलवर 13 रुपये प्रति लीटर एक्साइज ड्यूटी वाढवण्याची घोषणा केली होती. मे 2014 मध्ये पेट्रोलवर एकूण टॅक्स 9.48 रुपये प्रति लीटर आणि डिझेलवर 3.56 रुपये प्रति लीटर होता. तेव्हापासून आतापर्यंत पेट्रोलवरील टॅक्स वाढून 32.98 प्रति लीटर आणि डिझेलवरील टॅक्स 31.83 रुपये प्रति लीटर झाला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारांद्वारा सतत टॅक्स वाढवला जात असल्याने, क्रूड स्वस्त होण्याचा फायदा ग्राहकांना मिळत नसून, त्यांना पेट्रोल-डिझेलसाठी अधिक खर्च करावा लागत आहे.

पेट्रोलवर लागणार टॅक्स आणि कमिशन -

एक्स फॅक्टरी किंमत - 25.32 रुपये

भाडे आणि इतर खर्च - 0.36 रुपये

एक्साइज ड्यूटी - 32.98 रुपये

डीलर कमीशन - 3.69 रुपये

VAT - 18.71 रुपये

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानीला सामोरे जाण्यासाठी सरकार तिसऱ्या मदत पॅकेजची तयारी करत आहे. अशात सरकारला अधिक फंडची गरज आहे. त्यामुळे सरकार याची भरपाई टॅक्सद्वारे करत आहे. मात्र टॅक्स वाढल्यानंतर, पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढू नये यासाठी सरकारकडून नव्या योजनांवर काम सुरू आहे.

1 रुपया एक्साइज ड्यूटी वाढल्याने सरकारला किती फायदा?

पेट्रोल आणि डिझेलच्या एक्साइज ड्यूटीमध्ये एक रुपयाच्या वाढीमुळे, केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये वर्षाकाठी 13000-14000 कोटी रुपयांची वाढ होते. त्याशिवाय, क्रूडच्या किंमती कमी झाल्यामुळे सरकारला व्यापारातील तूट कमी होण्यास मदत होते. भारत आपल्या गरजेनुसार, जवळपास 82 टक्के क्रूड खरेदी करतो. क्रूडच्या किंमती घटल्याने, देशाच्या करंट अकाउंट डेफिसिट अर्थात चालू खात्यातील तूटही (current account deficit) कमी होते.

Published by: Karishma Bhurke
First published: October 26, 2020, 4:58 PM IST

ताज्या बातम्या