या बजेटमध्ये इनकम टॅक्समध्ये मिळणार मोठा दिलासा? आर्थिक पाहणी अहवालाचे संकेत

या बजेटमध्ये इनकम टॅक्समध्ये मिळणार मोठा दिलासा? आर्थिक पाहणी अहवालाचे संकेत

केंद्रीय अर्थसंकल्पात इनकम टॅक्समध्ये मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालात याचे संकेत मिळाले.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थसंकल्पात इनकम टॅक्समध्ये (Income Tax Slab Changes)मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालात याचे संकेत मिळाले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman)यांनी शुक्रवारी संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल (Economic Survey 2020) सादर केला. यामध्ये सरकार बजेटमध्ये करदात्यांना दिलासा देण्याची घोषणा करू शकतं. त्याचबरोबर संरचना क्षेत्रात गुंतवणूक करण्याची घोषणाही होऊ शकते.

कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केल्यानंतर पर्सनल इनकम टॅक्समध्ये सवलतीची मागणी जोर धरतेय.

अर्थव्यवस्थेमध्ये मागणी आणि पुरवठा वाढवण्यासाठी लोकांची क्रयशक्ती वाढणं गरजेचं आहे. तज्ज्ञांच्या मते, करदात्यांना सवलत देऊन ही मागणी वाढवली जाऊ शकते. गेल्या काही वर्षांत इनकम टॅक्सच्या सेक्शन 80C नुसार सवलतीची मर्यादा वाढवली जाऊ शकते. अर्थतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 5 लाख रुपयांपर्यंत शून्य कर असला पाहिजे. यानंतर 5 ते 10 लाख रुपयांपर्यंतच्या कमाईवर 20 टक्क्यांऐवजी 10 टक्के, 10 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंतच्या कमाईवर 20 टक्के आणि 20 लाख रुपयांवरच्या कमाईवर 30 टक्के कर असला पाहिजे.

(हेही वाचा : Economic Survey 2020: जाणून घ्या अर्थव्यवस्थेच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी)

6 वर्षांत नाही झाला बदल

नोकरी करणाऱ्यांसाठी इनकम टॅक्सच्या सेक्शन 80 C नुसार मिळणारी सूट ही इनकम टॅक्समधून मोठा दिलासा आहे पण गेल्या 6 वर्षांत या मर्यादेत कोणताही बदल झालेला नाही. सध्या ही मर्यादा दीड लाख रुपयांची आहे. लाइफ इन्शुरन्स प्रिमियम, पीएफचं योगदान, मुलांची ट्यूशन फी, हाउसिंग लोन या सगळ्याचं मुद्दल आणि पीपीएफमधलं योगदान हे सगळं 80 C अंतर्गत येतं. या सगळ्याचा अंतर्भाव करायचा असेल तर दीड लाख रुपयांची मर्यादा पार होते.

(हेही वाचा : सूर्याच्या पृष्ठभागावर सोन्याची चमक आणि मधमाशांची पोळी,पहिल्यांदाच समोर आले फोटो)

NPS मध्ये दिलासा

केंद्रीय अर्थसंकल्पात राष्ट्रीय पेन्शन योजनेतल्या योगदानाची रक्कम वाढण्याची अपेक्षा आहे.सध्या 50 हजार रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर करात सवलत मिळते. ती आता एक लाख रुपये करावी, अशी मागणी होतेय.

महागाई वाढतेय आणि राहणीमानाच्या दृष्टीने खर्चही वाढतोय. या स्थितीत निवृत्तीनंतर लोकांकडे पैशाची तरतूद असली पाहिजे.नॅशनल पेन्शन स्कीममध्ये जास्त निधी आला तर संरचनात्मक विकासाच्या योजनांसाठी त्याची मदत होईल.

=============================================================================================

First published: January 31, 2020, 3:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading