3 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 'इथे' होणार नोकरकपात

3 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 'इथे' होणार नोकरकपात

Jobs, Government Jobs - सरकारी नोकरीत कामचुकार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येणार आहे

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : भारतीय रेल्वेनं एक मोठा निर्णय घेतलाय. जे कर्मचारी काम करत नाहीत अशांची एक यादी तयार केलीय. ज्यांनी 55 वर्ष पूर्ण केलीयत किंवा 2020च्या पहिल्या तिमाहीपर्यंत रेल्वेमध्ये आपल्या नोकरीची 30 वर्ष पूर्ण केलीयत. त्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे.

रेल्वे बोर्डानं झोनल अधिकाऱ्यांना सांगितलंय की त्यांच्या कर्मचाऱ्यांचं रेकाॅर्ड तपासा. यात जे 55  वर्षांहून मोठे आहेत त्यांचा समावेश केला गेलाय. त्यांची 30 वर्ष नोकरी झाल्यानं त्यांना निवृत्ती लागू होऊ शकते. तशी यादी करायला रेल्वे बोर्डानं सांगितलं.

पेट्रोलनंतर सोनं-चांदीही झालं स्वस्त, 'हे' आहेत सोमवारचे दर

9 ऑगस्टपर्यंत झोनल ऑफिस पाठवतील लिस्ट

रेल्वेनं 27 जुलैला हे पत्र पाठवलं. लिस्ट पाठवायची शेवटची तारीख 9 ऑगस्ट आहे. रेल्वे सूत्रानं सांगितलं, वेळोवेळी केलेल्या रिव्ह्यूत कोण काम करत नाही हे पाहिलं जातं. आणि त्यांना वेळेआधी निवृत्त केलं जातं. सरकार याबाबत गंभीर आहे.

Moneycontrol Pro आता वेबसाइट,अ‍ॅपवर उपलब्ध! आर्थिक नियोजन अधिक सोपं

सरकार करणार कारवाई

लोकसभेत माहिती दिली होती की, वेगवेगळ्या सरकारी विभागात काम करणाऱ्या ग्रुप A आणि ग्रुप Bच्या 1.19 लाखाहून जास्त ऑफिसर्सच्या परफाॅर्मन्सची चौकशी केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार रेल्वेत 13 लाख कर्मचारी आहेत आणि मंत्रालयाची  इच्छा आहे की संख्या 10 लाख असावी.

1 ऑगस्टपासून तुमचे वाचणार पैसे, या गोष्टी होणार 'स्वस्त'

कर्मचाऱ्यांची माहिती देणार झोनल ऑफिस

झोनल रेल्वे अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांचा मानसिक आणि शारीरिक फिटनेस, त्यांचा अटेंडन्स आणि शिस्त याची माहिती मागवलीय.

याशिवाय कर्मचारी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात की नाही, हेही पाहिलं जाणार आहे. त्यानुसार निर्णय होणार आहे.

SPECIAL REPORT : राष्ट्रवादीला कुणी लावला सुरूंग? पवारांची काय असेल रणनीती?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jobs
First Published: Jul 29, 2019 07:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading