Elec-widget

इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरीत मोठी भरती, 'असा' करा अर्ज

इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरीत मोठी भरती, 'असा' करा अर्ज

Government Job - तुम्ही इंजिनियर असाल तर तुम्हाला सरकारी नोकरीत संधी आहे

  • Share this:

मुंबई, 24 जुलै : तुम्ही सिव्हिल इंजिनियरिंग केलंय आणि नोकरी शोधताय? मग तुम्हाला चांगली संधी आहे. महाराष्ट्र जलसंपदा विभागात 500 जागांसाठी भरती आहे. या पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि सिव्हिल इंजिनियरिंग डिप्लोमा किंवा तत्सम डिगरी हवी. याबद्दल अधिक माहिती पुढीलप्रमाणे-

पद -  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब)

पदांची संख्या - 500

शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण आणि सिव्हिल इंजिनियरिंग डिप्लोमा

वयाची अट - 15 ऑगस्ट 2019ला 18 ते 38 वर्षापर्यंत हवं. मागासवर्गीयांना 5 वर्ष सूट मिळेल

Loading...

व्याजदर कमी झाले तरी 'या' योजनेत अजूनही दुप्पट होतात तुमचे पैसे

नोकरीचं ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असेल.

अर्ज करायची शेवटची तारीख - 15 ऑगस्ट 2019 ( रात्री 12 वाजेपर्यंत )

अर्जाची फी सामान्य वर्गास 500 रुपये आणि आरक्षण असलेल्यांना 300 रुपये

देशाची नंबर 1 कंपनी झाली रिलायन्स इंडस्ट्री, 'ही' आहे फाॅर्च्युन ग्लोबल 500ची लिस्ट

अर्जाची प्रक्रिया 25 जुलैपासून सुरू होतेय. अर्ज ऑनलाइन करावा. त्यासाठी https://wrd.maharashtra.gov.in/ इथे क्लिक करावं.

तसंच,स्टील अथाॅरिटी ऑफ इंडिया लिमिटेडनं ( SAIL ) एक्झिक्युटिव्ह आणि नाॅन एक्झिक्युटिव्ह पदासाठी व्हेकन्सी काढल्यात. या पदांसाठी 31 जुलैच्या आधी अर्ज करावा, असं कंपनीनं सांगितलंय.

कमी गुंतवणुकीत जास्त फायदा, रोज कमवा 4 हजार रुपये

एक्झिक्युटिव्ह आणि नाॅन एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करण्यासाठी स्टील अथाॅरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची ऑफिशियल वेबसाइट sail.co.in वर जाऊन अर्ज करा. SAIL मध्ये एकूण 205 व्हेकन्सीज आहेत. त्यात 29 पदं एक्सिक्युटिव्हसाठी आहेत आणि 176 पदं नाॅन एक्झिक्युटिव्हसाठी आहेत.

मॅनेजमेंटसाठी अर्ज करणारा उमेदवार Fire Engineering मध्ये पदवी मिळवलेला असावा. Junior Manager (Safety)साठी अर्ज करणारा मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीकडून इंजीनियरिंगमध्ये पदवी मिळवलेला असावा. डेप्युटी मॅनेजरसाठी उमेदवाराकडे Mechanical Engineering ची पदवी हवी.

दरम्यान,मोदी सरकारच्या 100 दिवसांच्या अजेंड्यांमध्ये नोकऱ्या आणि रोजगार वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. नीती आयोग आता नव्या सरकारसाठी आर्थिक अजेंडा बनवणार आहे. यामध्ये देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात येणार आहेत.

कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यासाठी सरकार खाजगी शिक्षण संस्थांना कर्ज देणार आहे. त्याशिवाय खाजगी कंपन्यांना सवलती देण्याचाही सरकार विचार करत आहे. स्किल इंडियासाठी सरकारने 3400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. आता हा निधी आणखी वाढवण्यात येईल.

खवळलेल्या समु्द्रात पडला तरूण, जीव वाचवण्याचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jobs
First Published: Jul 24, 2019 05:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...