सरकारने लागू केली आरोग्य विम्याची नवी योजना; कोरोनानंतर आखलेल्या प्लान बद्दल जाणून घ्या

सरकारने लागू केली आरोग्य विम्याची नवी योजना; कोरोनानंतर आखलेल्या प्लान बद्दल जाणून घ्या

इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी ही योजना आणली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : रेग्युलर हेल्थ इन्शुरन्स आणि कोविड स्पेसिफिक कव्हर्स नंतर आपल्याला 1 जानेवारी 2021 पासून स्टॅंडर्ड टर्म इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करता येणार आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी ही योजना आणली आहे. जी सर्व इन्शुरन्स कंपन्यांना सक्तीने लागू करावी लागणार आहे. त्यांना या पॉलिसीची विक्री सरल जीवन बीमा या नावाने करावी लागणार आहे. सर्व इन्शुरन्स कंपन्यांना याची विक्री 1 जानेवारी 2021 पासून करावी लागणार आहे.

आयआरडीएआयचे प्रमुख सुभाष खुंटिया यांनी या आधीच अशी पॉलिसी येणार असल्याची  घोषणा केली होती.

या पॉलिसीतून तुम्हाला काय देण्यात येणार आहे?

या पॉलिसीची मुदत 5 ते 40 वर्षे असून 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना ऑफर केली जाणार आहे.‌ या पोलिसीमध्ये तुम्ही कमीत कमी 5,00,000 ते जास्तीत जास्त 25,00,000 इतक्या  रक्कमेचं कव्हर (Sum assured) निवडू शकता. तसंच तुम्हाला त्याहून अधिक कव्हर हवं असेल तर सरल जीवन बीमा पॉलिसीचे सर्व नियम तसेच ठेऊन इन्शुरन्स कंपनी तुम्हाला तशी पर्यायी विमा पॉलिसी देऊ शकते.

तुम्ही रेगुलर प्रीमियम पेईंग टर्म तसेच लिमिटेड पेईंग पिरियड टर्म जसं पाच ते 10 वर्षांचा काळ असतो किंवा सिंगल प्रीमियम पेमेंट निवडू शकता. रेगुलर आणि लिमिटेड पे पॉलिसीचा प्रीमियम दरमहा किंवा सहा महिन्यातून एकदा तसंच वर्षभरात एका हप्त्यात भरू शकता. वार्षिक प्रीमियमच्या दहा पट रक्कम, मृत्युपर्यंत भरलेल्या  प्रीमियमचे105 टक्के रक्कम आणि पॉलिसीधारकाला कंपनीने दिलेली सम अश्युअर्ड यापैकी जी रक्कम सर्वाधिक असेल ती एखाद्या पॉलिसीधारकाचा मृत्यु झाला तर डेथ बेनिफिट म्हणून मिळेल.

सिंगल प्रीमियम पॉलिसीमधून Death benefit हा प्रीमियमच्या एका हप्त्याच्या रकमेच्या 125 टकक्यांहून अधिक आणि मृत्युनंतर कंपनीने सांगितलेल्या डेथ बेनिफिटपेक्षा अधिक मिळणार आहे. तसेच ॲडिशनल प्रीमियम भरून विमाधारकांना अपघात आणि कायम अपंगत्व असे दोन पर्याय देण्यात येणार आहेत.

पॉलिसी जारी केल्यापासून 45 दिवसांनंतर ती लागू होणार आहे तसेच या दिवसात पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत्यू ग्राह्य धरला जाणार आहे. अन्य कारणांमुळे मृत्यू झाल्यास  कर वगळता प्रीमियमची 100 टक्के रक्कम विमाधारकाच्या वारसांना देण्यात येणार आहे.

इतर टर्म प्लॅन चालणार नाहीत का?

प्युअर प्रोटेक्शन टर्म इन्शुरन्सची मागणी अनेक वर्षांपासून खूपच वाढली होती. टर्म प्लॅन ही सर्व विमा पॉलिसी पैकी सर्वात सोपी असते. ज्यातून आपल्या मृत्यूनंतर आपल्या वारसांना एक ठराविक रक्कम मिळते व आपण गेल्यानंतर आपल्या परिवाराला आर्थिक सहाय्य मिळू शकतं.  पण सध्याच्या इतर एंडोव्हमेंट पॉलिसींमध्ये तुम्ही जर पॉलिसी संपेपर्यंत जिवंत असाल तर तुम्ही भरलेल्या हप्त्यांवर तुम्हाला कुठलंही व्याज देत नाहीत. त्यामुळे त्या टर्म प्लॅनचा प्रीमियमही कमी असतो. पण बाजारातील अनेक टर्म प्लॅन लोकांना गोंधळात टाकतात.

ग्राहकांना योग्य ती माहिती देऊन कुठला प्लॅन निवडायचा हे सोपे जाईल किंवा कशावर विश्वास ठेवायचा याचा निर्णय ते घेऊ शकतील अशाच प्रकारे आम्ही प्लॅन्स तयार करणार आहोत. ज्यामुळे इन्शुरन्स कंपन्या आणि ग्राहकांतील विश्वास वाढेल. विमा विकतानाची फसवणूक आणि क्लेम सेटलमेंटवेळी होणारे वादही कमी होतील, असं आयआरडीएआयने सांगितले.

आयआरडीएनी पॉलिसीची भाषा सर्व कंपन्यांनी सारखी ठेवण्यावर भर दिला असून  तसेच आरोग्य संजीवनी, कोरोना कवच आणि कोरोना रक्षक स्टॅंडर्ड पॉलिसींचे प्रीमियम त्याच्याशी संबंधित विविध घटकांचा विचार करून ठरवण्याची मुभा कंपन्यांना देण्यात आली आहे. रेग्युलेटर त्या किमतींना मान्यता देणार आहे, असं बजाज अलियांझ लाइन इन्शुरन्सचे चीफ फायनॅन्शियल ऑफिसर भारत कालसी यांनी सांगितलं.

स्टॅंडर्ड टर्म योजना चांगली आहे का ?

‘पहिल्यांदाच लाइफ इन्शुरन्स प्लॅन घेणाऱ्यांसाठी हा प्लॅन एक वरदान ठरणार आहे. कोणत्याही कंपनीकडून ही पॉलिसी घेतली तरीही सगळी फीचर्स सारखी असतील कदाचित कंपनीनुसार त्यांचा प्रीमियम वेगळा असेल, असं पॉलिसी बाजार डॉट कॉम'च्या लाइफ इन्शुरन्स विभागाचे मुख्य व्यवसाय अधिकारी संतोष अग्रवाल यांनी सांगितलं.

या पॉलिसीसाठी तुमचे वय, उत्पन्न, आरोग्याबद्दलची माहिती तसेच तुम्ही धूम्रपान करता की नाही याबद्दलची सर्व माहिती घेण्यात येणार आहे. धुम्रपान न करणाऱ्याला कमी हप्ता बसेल.

तसेच जेबी बोडा इन्शुरन्स आणि रिइन्शुरन्स ब्रोकर्स कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सरोज कांता सत्पथी यांच्या म्हणण्यानुसार Death benefit हे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे कारण लाइव्हलिहूड प्रोटेक्शन पॉलिसींचा विचार करून तो देण्यात येणार आहे. पॉलिसी घेतल्यानंतर पहिल्या वर्षात व्यक्तीने आत्महत्या केल्यास त्याला हे बेनिफिट मिळणार नाहीत.

मनी कंट्रोलचं मत

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींप्रमाणेच प्युअर प्रोटेक्शन रेगुलर टर्म इन्शुरन्स पॉलिसी या अत्यंत सोप्या आहेत. विमाधारक हप्ते भरतो त्याचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी विम्याची रक्कम ही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देते. स्ट्रॅगर्ड पे आउट्स, लंप-सम पे आउट्स, महागाईशी संबंधित काही पे आउट्स असे अनेक पर्याय कंपन्यांनी काढले. त्यामुळे सामन वैशिष्ट्य असणाऱ्या सध्याच्या हेल्थ पॉलिसींशी तुलना केली तर या नव्या पॉलिसीचे नियम सरळसोट असल्याने ग्राहकांचा गोंधळ कमी होईल पण त्याचा मर्यादित स्वरूपातच त्यांना फायदा होईल. जर तुम्ही पहिल्यांदाच विमा घेत असाल तर सगळ्या कंपन्यांचे नियम एकच असल्याने तुम्हाला चिंता करावी लागणार नाही. नियमांची समान भाषा आणि विम्यातून वगळलेल्या गोष्टी समान असल्यामुळे नंतरचे वाद कमी होतील. एकदा कंपन्यानी या पॉलिसीसाठी त्यांचे प्रीमियम जाहीर केले की कोणत्या कंपनीने सर्वाधिक क्लेम सेटल केले आहेत आणि किती रूपये ग्राहकांना दिले आहेत हे पाहूनच तुम्ही कंपनीची निवड करावी.

Published by: Manoj Khandekar
First published: October 28, 2020, 10:37 PM IST
Tags: insurance

ताज्या बातम्या