गेल्या आर्थिक वर्षाचा कंझ्युमर सर्व्हे जाहीर करणार नाही सरकार; हे आहे कारण

गेल्या आर्थिक वर्षाचा कंझ्युमर सर्व्हे जाहीर करणार नाही सरकार; हे आहे कारण

गेल्या आर्थिक वर्षाचा (2017- 18)घरगुती ग्राहक खर्चाचं सर्वेक्षण Household Consumer Expenditure Survey जाहीर न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : गेल्या आर्थिक वर्षाचा (2017- 18)घरगुती ग्राहक खर्चाचं सर्वेक्षण Household Consumer Expenditure Survey जाहीर न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शुक्रवारी माहिती खात्याने (PIB) जारी केलेल्या निवेदनात सरकारतर्फे याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. दर पाच वर्षांनी हा सर्व्हे केला जातो. जुलै 2017 ते जून 2018 दरम्यानच्या काळासाठी सर्व्हे केला गेला. पण त्याचा अहवाल आता जाहीर करण्यात येणार नाही. या सर्वेक्षणाच्या आकड्यांमध्ये काही गोंधळ असल्याचं लक्षात आल्यानं सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. आता 2020-21 वर्षात नवा सर्व्हे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

2017-18 च्या या सर्वेक्षणाबाबत काही बातम्या सांख्यिकी मंत्रालयाच्या Ministry of Statistics and Programme Implementation (MOSPI)निदर्शनास आल्या. NSS च्या सर्वेक्षणात consumer expenditure कमी झाल्याचं दिसलं आणि काही नकारात्मक निष्कर्ष दिसल्याने तो अहवाल दडपून टाकण्यात आल्याच्या या बातम्या चुकीच्या असल्याचं सांगताना मंत्रालयानं म्हटलं आहे की, या सर्वेक्षणाचा डेटा प्रचंड मोठ्या प्रमाणावर असतो आणि त्याचा अर्थ लावण्याची प्रक्रियाही प्रचंड असते. मंत्रालयाकडे आलेली निरीक्षणं ही ड्राफ्ट स्वरूपाची असून ती अंतिम समजू नयेत.

वाचा - सत्तास्थापना सध्याच शक्य नाही, वेळ लागणार, शरद पवारांचं सगळ्यात मोठं विधान

या निरीक्षणात आणि जमा केलेल्या माहितीमध्ये तफावत आढळल्याने हे सर्वेक्षण रद्द करण्यात आलं आहे. आता पुढच्या आर्थिक वर्षात हे सर्वेक्षण नव्याने करण्यात येईल. दर पाच वर्षांनी Household Consumer Expenditure Survey करण्यात येतो.

अन्य बातम्या

Special Report : 'ती' परत येतेय... नव्या स्वरूपात आणि नवं तंत्रज्ञान घेऊन

काळजाचा थरकाप! मित्राने केलं अपहरण, हत्या करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले...

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: November 15, 2019, 9:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading