मराठी बातम्या /बातम्या /मनी /दिवाळीआधी महाराष्ट्राशेजारील राज्यात इंधन स्वस्त होणार, हे आहे कारण

दिवाळीआधी महाराष्ट्राशेजारील राज्यात इंधन स्वस्त होणार, हे आहे कारण

दिवाळीआधी इंधनाचे दर कमी झाल्याने गुजरातमधील 35 लाखहून अधिक कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दिवाळीआधी इंधनाचे दर कमी झाल्याने गुजरातमधील 35 लाखहून अधिक कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दिवाळीआधी इंधनाचे दर कमी झाल्याने गुजरातमधील 35 लाखहून अधिक कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई : दिवाळीआधी वाढत्या महागाईत मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्राशेजारील राज्यात इंधनाचे दर स्वस्त झाले आहेत. दिवाळीआधी इंधनाचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे आनंदाची बातमी आहे. गुजरात सरकारने विधानसभा निवडणुकीची घोषणेआधी इंधनाचे दर कमी केले आहेत.

दिवाळीआधी इंधनाचे दर कमी झाल्याने गुजरातमधील 35 लाखहून अधिक कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. CNG आणि PNG वरील वॅटच्या दरात १० टक्क्यांनी घट केली आहे. CNG 7 तर PNG 5 रुपयांनी स्वस्त केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांसाठी हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.

'हा' नियम मोडाल तर जेलची हवा खाल, ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांसाठी अलर्ट

दुसरीकडे दिवाळीआधी दर कमी झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गुजरात विधानसभा निवडणूक 2018 ची घोषणा होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसोबतच 8 डिसेंबरलाही होऊ शकते.

गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. 14 व्या गुजरात विधानसभेचा कार्यकाळ 18 फेब्रुवारी 2023 रोजी संपणार आहे. 182 जागांच्या गुजरात विधानसभेची निवडणूक डिसेंबर 2017 मध्ये झाली होती. भाजपने सत्ता कायम राखत विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन केले.

'या' शेतीतून मिळवा कोट्यवधी रुपयांचा नफा; एकदा लागवड करा आणि मोठा नफा मिळवा

गुजरातच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपची गुजरातमध्ये गौरव यात्रा सुरू आहे. विधानसभा क्षेत्रात सार्वजनिक कार्यक्रम करण्याच्या तयारीत आहे.

First published:

Tags: BJP, Gujrat