आता डिलिव्हरी अ‍ॅप सोडा, गुगलवरूनच करा 'अशी' जेवणाची ऑर्डर

आता डिलिव्हरी अ‍ॅप सोडा, गुगलवरूनच करा 'अशी' जेवणाची ऑर्डर

तुम्हाला जेवण किंवा काही खाण्याचे पदार्थ ऑर्डर करायचेत? तुम्हाला आता कुठलंही अ‍ॅप डाऊनलोड करायची गरज नाही.

  • Share this:

मुंबई, 25 मे : तुम्हाला जेवण किंवा काही खाण्याचे पदार्थ  ऑर्डर करायचेत? तुम्हाला आता कुठलंही अ‍ॅप डाऊनलोड करायची गरज नाही. गुगलमधून तुम्ही सरळ सर्च, मॅप्स किंवा असिस्टंटची मदत घेऊन पदार्थांची  ऑर्डर करू शकाल.

गुगलनं आता  ऑर्डर  ऑनलाइन हे बटन सर्च आणि मॅप्सवर अ‍ॅड केलंय. गुगलवरच्या संबंधित रेस्टाॅरंटला युजर सर्च करेल, तेव्हा हे बटन समोर येईल. द व्हर्जनं ही माहिती दिलीय.

LIC मध्ये अधिकारी पदांसाठी 1753 व्हेकन्सीज्, 'असा' करा अर्ज

युजर पिकअप आणि डिलिव्हरी निवडून युजर त्यांचे पदार्थ कुठल्या सर्विसद्वारे  ऑर्डर करायचेत हे निवडेल.

रेस्टाॅरंटनं ओके केलं की मग पूर्ण  ऑर्डर गुगल्स इंटरफेस आणि गुगल पेद्वारे करता येते.

तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे? मग मिळू शकते सरकारी नोकरी

युजर गुगल असिस्टंटला आधीची  ऑर्डर रिपिट करायला सांगू शकतो.

पण अजून एक गोष्ट स्पष्ट व्हायचीय की, गुगल असिस्टंटसोबत  ऑर्डर करायची सुविधा आहे की नाही ते.

क्लासमधील विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी तरूणानं घेतली आगीत उडी; पण...

या नव्या सुविधेत 5 विविध डिलिव्हरी सर्विसेस आहेत. DoorDash, Postmates, Delivery.com, Slice आणि ChowNo. शिवाय गुगल लवकरच Zuppler अ‍ॅड करणार आहे.

काही दिवसांपूर्वी सर्च इंजिन जायंट यांनी सर्च इंटरफेस मोबाइलसाठी नव्या डिझाइनमध्ये आणलंय. यामुळे मोबाइल युजर्सना कुठली माहिती कुठून येतेय, हे कळू शकतं.


VIDEO : संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना मानाचे पान!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2019 05:59 PM IST

ताज्या बातम्या