Home /News /money /

Google 70 कोटी डॉलरमध्ये खरेदी करणार Airtel मधील हिस्सेदारी, काय आहे प्लानिंग?

Google 70 कोटी डॉलरमध्ये खरेदी करणार Airtel मधील हिस्सेदारी, काय आहे प्लानिंग?

Google द्वारे Bharti Airtel कंपनीमध्ये 70 कोटी डॉलरच्या स्टेक खरेदी व्यतिरिक्त, ते विविध व्यावसायिक करारांची अंमलबजावणी करण्यासाठी आणखी 30 कोटी डॉलरची गुंतवणूक करेल.

    मुंबई, 28 जानेवारी : भारतातील दूरसंचार क्षेत्रातील (Telecom Sector) दिग्गज कंपनी भारती एअरटेलने ( Bharti Airtel) यूएस तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज गुगलसोबत (US technology giant Google) धोरणात्मक भागीदारी जाहीर केल्यानंतर 28 जानेवारी रोजी भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांनी वाढ झाली. आज सकाळी 9.34 वाजता कंपनीचा शेअर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये 711.8 रुपयांच्या किमतीवर व्यवहार करत होता. Google 70 कोटी डॉलर गुंतवून भारती एअरटेलमधील भागभांडवल खरेदी करेल. Bharti Airtel कंपनीचे 7.12 कोटी शेअर्स Google ला प्राधान्याच्या आधारावर 734 रुपयांच्या किमतीवर जारी करेल, जे 27 जानेवारी रोजी बंद होणाऱ्या किंमतीपेक्षा 4 टक्के प्रीमियम आहे. इक्विटी शेअर्सच्या प्रिफरेंशियल अलॉटमेंटमुळे देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या टेलिकॉम ऑपरेटरमध्ये Google ची 1.28 टक्के हिस्सेदारी असेल, असे कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे. Google द्वारे कंपनीमध्ये 70 कोटी डॉलरच्या स्टेक खरेदी व्यतिरिक्त, ते विविध व्यावसायिक करारांची अंमलबजावणी करण्यासाठी आणखी 30 कोटी डॉलरची गुंतवणूक करेल. तुमच्या कामाची बातमी! Ratıon Card वर डीलर कमी धान्य देतोय? या नंबरवर लगेच करा तक्रार भारती एअरटेलने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पहिल्या व्यावसायिक कराराचा एक भाग म्हणून, एअरटेल आणि Google इनोव्हेटिव्ह अफोर्डेबिलिटी प्रोग्रामद्वारे ग्राहकांना Android डिव्हाइसेसच्या श्रेणीसह एअरटेलच्या सर्वसमावेशक ऑफर तयार करण्यासाठी एकत्रितपणे काम करतील. टेलिकॉम ऑपरेटर भारती एअरटेलने देखील प्रतिस्पर्धी रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या जिओफोन नेक्स्टच्या धर्तीवर परवडणाऱ्या स्मार्टफोनवर संभाव्य सहकार्याचे संकेत दिले आहेत. Bharti Airtel ने सांगितले की, "कंपन्या अडथळे कमी करण्यासाठी आणि विविध उपकरण निर्मात्यांसोबत भागीदारी करून वेगवेगळ्या किमतीत स्मार्टफोन खरेदी करण्याच्या संधी शोधत राहतील. LIC IPO बाबत सस्पेन्स संपला! वाचा केव्हा येणार हा मेगा आयपीओ? लवकरच आहे कमाईची संधी भारती एअरटेलने सांगितले की ते Google च्या नेटवर्क व्हर्च्युअलायझेशन सोल्यूशन्सची अंमलबजावणी करेल आणि 5G नेटवर्कसाठी भारत-विशिष्ट नेटवर्क डोमेन तयार करण्यात देखील मदत करेल. Google आणि Alphabet चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई (Sundar Pichai) म्हणाले, Airtel मधील आमची व्यावसायिक आणि इक्विटी गुंतवणूक स्मार्टफोन्समध्ये प्रवेश वाढवेल, नवीन व्यवसाय मॉडेल्सना सपोर्ट देण्यासाठी कनेक्टिव्हिटी वाढवेल आणि कंपन्यांच्या वाढीस मदत करेल. त्यांच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये त्यांना मदत करण्यासाठी आमच्या गुगल फॉर इंडिया डिजिटायझेशन फंडाच्या प्रयत्नांना चालना देत आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Airtel, Google, Tech news

    पुढील बातम्या