मराठी बातम्या /बातम्या /मनी /Google Pixel 6a स्मार्टफोन लवकरच होणार लाँच, आतापर्यंतचे सर्वात तगडे फीचर्स मिळणार?

Google Pixel 6a स्मार्टफोन लवकरच होणार लाँच, आतापर्यंतचे सर्वात तगडे फीचर्स मिळणार?

Google Pixel 6a Launch Date: Google लवकरच आपला स्वस्त स्मार्टफोन लॉन्च करू शकते. या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरे आणि 4500mAh बॅटरी मिळू शकते. कंपनी पुढील आठवड्यात हा हँडसेट लॉन्च करणार आहे. या डिव्हाईसमध्ये काय खास असू शकते ते जाणून घेऊया.

Google Pixel 6a Launch Date: Google लवकरच आपला स्वस्त स्मार्टफोन लॉन्च करू शकते. या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरे आणि 4500mAh बॅटरी मिळू शकते. कंपनी पुढील आठवड्यात हा हँडसेट लॉन्च करणार आहे. या डिव्हाईसमध्ये काय खास असू शकते ते जाणून घेऊया.

Google Pixel 6a Launch Date: Google लवकरच आपला स्वस्त स्मार्टफोन लॉन्च करू शकते. या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरे आणि 4500mAh बॅटरी मिळू शकते. कंपनी पुढील आठवड्यात हा हँडसेट लॉन्च करणार आहे. या डिव्हाईसमध्ये काय खास असू शकते ते जाणून घेऊया.

पुढे वाचा ...

  मुंबई, 6 मे : सध्या बाजारात अनेक फीचर्स (Features) असलेले स्मार्टफोन (Smartphone) उपलब्ध आहेत. फीचर्सनुसार प्रत्येक स्मार्टफोनची किंमत वेगवेगळी असते. ग्राहक त्यांची गरज आणि बजेटनुसार स्मार्टफोन खरेदी करताना दिसतात. इंटरनेट क्षेत्रात क्रांती करणाऱ्या गुगलनं (Google) स्मार्टफोनच्या दुनियेतही आपलं वेगळेपण जपलं आहे. गुगल पिक्सेल स्मार्टफोन ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसतात. गुगल पिक्सेल स्मार्टफोनप्रेमींसाठी ही बातमी विशेष महत्त्वाची आहे. लवकरच गुगल पिक्सेल 6a (Google Pixel 6a) हा स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता आहे. गुगलचा आयओ इव्हेंट (I/O Event) पुढील आठवड्यात आयोजित करण्यात आला आहे. 11 मे रोजी होणाऱ्या या इव्हेंटमध्ये गुगल त्यांचा किफायतशीर गुगल पिक्सेल 6a हा फोन लाँच करण्याची शक्यता आहे. परंतु, हा फोन भारतात लाँच होणार नसल्याने त्याबाबतची सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. फीचर्सचा विचार करता हा फोन वैशिष्ट्यपूर्ण असेल, असं बोललं जात आहे. `आज तक`ने या विषयीची माहिती दिली आहे.

  गुगल कंपनी 11 मे रोजी होणाऱ्या इव्हेंटमध्ये गुगल पिक्सेल 6a हा नवा स्मार्टफोन लॉंच करण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, या इव्हेंटमध्ये पिक्सेल वॉचदेखील (Pixel Watch) लाँच होण्याची शक्यता आहे. गुगल पिक्सेल 6a हा फोन नुकताच एफसीसी (FCC) सर्टिफिकेशन साईटवर पाहायला मिळला. या सर्टिफिकेशनमध्ये त्याची काही फीचर्स समोर आली आहेत. लवकरच हा फोन बाजारात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. गुगलने पिक्सेल 6 सीरिजमध्ये पिक्सेल 6 आणि पिक्सेल 6 प्रो (Pixel 6 Pro) असे दोन हँडसेट लाँच केले आहेत. मात्र, ही दोन्ही डिव्हाईस भारतात लाँच झालेली नाहीत. या पूर्वी कंपनीने पिक्सेल 5a हा स्मार्टफोन केवळ जागतिक बाजारात लाँच केला होता. आतापर्यंत पिक्सेल 4a हा भारतात लाँच झालेला शेवटचा फोन आहे.

  या Mental Health Apps द्वारे चोरी होतोय युजर्सचा डेटा, तुमच्या फोनमध्ये तर नाही?

  गुगल पिक्सेल 6a या फोनमध्ये 6.2 इंचाचा OLED स्क्रिन दिला जाऊ शकतो. हा स्क्रिन Full HD+ रिझोल्युशनसह असेल. याचा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या फोनमध्ये अँड्रॉईड 12 असेल. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असू शकतो, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

  यात मुख्य लेन्स 12 एमपीची असेल. दुसरी लेन्स 12.2 एमपीचा अल्ट्रा वाइड अ‍ॅंगल कॅमेराच्या (Ultra Wide Angle Camera) स्वरूपात असेल. फ्रंटला 8 एमपीचा सेल्फी कॅमेराही दिला जाऊ शकतो. तसंच पॉवरसाठी 20w चार्जिंगला सपोर्ट करणारी 4500mAhची बॅटरी या फोनमध्ये असू शकते.

  या स्मार्टफोनचं डिझाईन ओरिजनल पिक्सेल 6 सीरिजसारखं असेल. यात फ्लॅट डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो पंच होल (Punch Hole) डिझाईनसह असेल. हे डिझाईन सध्या अनेक स्मार्टफोन्समध्ये पाहायला मिळत आहे. तसंच हा फोन ग्लॉसी फिनिश बॅक असलेला असू शकतो. या फोनमध्ये 3.5mmचा जॅक असेल की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. परंतु, गुगल पिक्सेल 5a मध्ये हा ऑडियो जॅक दिला होता. त्यामुळे या नव्या फोनमध्ये तो असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. लीक झालेल्या रिपोर्टनुसार गुगल हाय-एंड पिक्सेल 6 फोन्समध्ये दिला जाणारा tensor चिपसेट या फोनमध्ये देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  First published:

  Tags: Google, Smartphone