मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Google Pay आणि PhonePe या चुका करु नका, दुसऱ्या अकाऊंटला ट्रान्सफर होतील पैसे

Google Pay आणि PhonePe या चुका करु नका, दुसऱ्या अकाऊंटला ट्रान्सफर होतील पैसे

Google Pay आणि PhonePe सारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही बँक खात्यांचे हे वेगवेगळे UPI आयडी एकत्र करू शकता. तुम्ही UPI आयडी जनरेट करता तेव्हा अॅड्रेस देखील वेगळा असतो.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 2 ऑगस्ट : डिजीटल पेमेंट अॅपद्वारे व्यवहार करणे अगदी सोपं झालं आहे. UPI हा देशातील सर्वात लोकप्रिय पेमेंट पर्याय आहे. 2016 मध्ये याची सुरुवात करण्यात आली होती. UPI आयडी वेगवेगळ्या बँक खात्यांशी देखील जोडला जाऊ शकतो. Google Pay आणि PhonePe सारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही बँक खात्यांचे हे वेगवेगळे UPI आयडी एकत्र करू शकता. तुम्ही UPI आयडी जनरेट करता तेव्हा अॅड्रेस देखील वेगळा असतो. तुम्ही Google Pay आणि PhonePe वर UPI आयडी तयार करता तेव्हा वेगळा अॅड्रेस असतो. पण हा अॅड्रेस कधी कधी अडचण बनू शकतो. याचे कारण म्हणजे वेगवेगळे UPI आयडी लक्षात ठेवणेही खूप कठीण होऊन बसते. आज आम्ही तुम्हाला असाच एक सोपा मार्ग सांगत आहोत. ज्याद्वारे तुम्ही विविध UPI आयडी सहजपणे हटवू शकता. 'फोनपे'वर UPI आयडी कसा हटवायचा ते जाणून घ्या UPI आयडी PhonePe वर '971XXXX@ybl' असा तयार केला जातो. तर Google Pay वर UPI आयडी तुमच्या नावानुसार म्हणजेच 'JaisinXXX@okicici' असा तयार केला जातो. PhonePe अॅपवरील आयडी हटवण्यासाठी, वरच्या डाव्या बाजूला प्रोफाइलवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला हटवायचे असलेल्या बँक खात्यावर क्लिक करा. आत तुम्हाला UPI आयडी विभागातील सर्व UPI आयडी दिसतील. उजव्या बाजूला तुम्हाला डिलीट बटण दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही UPI आयडी सहज हटवू शकता. गुगल पेवरील UPI आयडी कसा हटवायचा? GooglePay वर UPI आयडी हटवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. Google Pay अॅपवर गेल्यानंतर, प्रोफाइल वरच्या उजव्या बाजूला दिसेल. त्यानंतर बँक खात्यावर जा. यानंतर, तुम्हाला जे बँक खाते हटवायचे आहे. त्यावर क्लिक करा. येथे तुम्हाला UPI आयडी मॅनेजच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता तुम्ही सर्व UPI आयडी पाहू शकता. तुम्हाला UPI आयडीच्या थेट बाजूला डिलीट बटण दिसेल.
First published:

Tags: Online payments, Upi

पुढील बातम्या