मराठी बातम्या /बातम्या /मनी /गुगलला मोठा दणका! सरकारने ठोठावला 936 कोटींचा दंड

गुगलला मोठा दणका! सरकारने ठोठावला 936 कोटींचा दंड

Google

Google

सीसीआयने गुगलवर सुमारे 936.44 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने पुन्हा एकदा गुगल इंडियाला दणका दिला. यावेळी गुगलला प्ले स्टोअर पॉलिसीसाठी फटकारलं आणि मोठा दंडही भरायला लावला आहे. सीसीआयने गुगलवर सुमारे 936.44 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

गुगलच्या प्ले स्टोअर पॉलिसीसंदर्भात हा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. CNBCने दिलेल्या वृत्तानुसार सीसीआयने गुगलला Anti Competitive प्रॅक्टीस बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी गुगलला इशारा देखील देण्यात आला आहे.

गुगलनं अॅप डेव्हलपर्सवर कोणत्याही प्रकारची बंधन लादू नये, असं त्यांनी म्हटलं आहे. गुगल अॅप डेव्हलपर्सना थेट ग्राहकांशी संपर्क साधण्याची परवानगी द्यावी, असं सीसीआयचं म्हणणं आहे.

कमी वयातही श्रीमंत होण्याचा सिक्रेट फॉर्म्युला, बस दर महिन्याला करा 'हे' काम

सीसीआयने गुगलला अॅप डेव्हलपर्सच्या बाजूने आदेश दिले आहेत. या आदेशानुसार गुगल अॅप डेव्हलपर्सना त्यांच्या अॅप आणि ऑफर्सची जाहिरात करण्यापासून रोखू शकत नाही. त्यामुळे सीसीआयने गुगलला नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवलं.

प्रत्येक स्मार्टफोनमध्ये असलेल्या अॅप्सला चालण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टिमची गरज असते. गुगलने 2005 मध्ये अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टिम विकत घेतली.

बाजारात असलेल्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अँड्रॉइडचा वाटा सर्वात मोठा आहे. या प्रकरणी आयोगाने गुगलच्या विविध पद्धतींची तातडीने चौकशी सुरू आहे.

First published:

Tags: Google