मुंबई, 31 मे : कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाऊनमध्ये (Coronavirus) काही गुन्हे जरी कमी झाले असले तरी ऑनलाइन फ्रॉडचा धोका या काळात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सायबर क्राइमच्या घटनांमध्ये या कालावधीमध्ये वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेबरोबरच अनेक देशातील विविध संस्था कोरोनाशी लढण्यासाठी आर्थिक मदत उभी करत आहेत. याचा फायदा हे सायबर क्राइम करणारे भामटे उचलत आहेत. थेट E-mail पाठवून ग्राहकांना त्यांच्या जाळ्यात ओढायचे काम या चोरांकडून सुरू आहे.
अमेरिकेमध्ये 2018 साली अमेरिकन नागरिकांनी 427.71 अब्ज डॉलर समाजसेवेसाठी दान केले होते. याचा फायदा घेत हे भामटे पुन्हा एकदा पैसे लाटण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे गुगल (Google), मायक्रोसॉफ्ट (Microsoft) आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने (Federal Reserve Bank) नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सावधान राहण्याचा इशारा दिला आहे.
(हे वाचा-घरापर्यंत होईल पेट्रोल आणि CNG ची डिलीव्हरी, पेट्रोलियम मंत्र्यांचे संकेत)
महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार नॉटर्न या संस्थेने लोकांना असे आवाहन केले आहे की, पैशांचे दान देण्यापूर्वी तुमच्याकडे मदत मागणाऱ्या संस्थेची तुमच्या देशात किंवा राज्यामध्ये नोंदणी झाली आहे याची चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. भारतात देखील विविध सरकारी आणि खाजगी बँकांकडून वेळोवेळी त्यांच्या ग्राहकांना अलर्ट पाठवण्यात येत आहे. जेणेकरून ग्राहक कोणत्याही फिशींग किंवा ऑनलाइन फसवणुकीला बळी पडणार नाहीत.
गुगलने देखीस त्यांच्या युजर्सना सावधानतेचा इशारा दिला आहे, त्यांनी युजर्सना 1755 वॉर्निंग्स पाठवल्या आहेत. गुगलच्या थ्रेट अॅनालिसिस ग्रृपला मिळालेल्या माहितीनुसार अनेक हॅकर्स भारतातून ऑपरेट होत आहेत. हे हॅकर्स WHO च्या नावाने इमेल तयार करून अमेरिका, कॅनेडा, भारत, बहरीन, सायप्रस आणि इंग्लंडमधील आर्थिक आणि स्वास्थ्य संस्थांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत.
(हे वाचा-लॉकडाऊन 4.0 मध्ये 932 रुपयांनी घसरलं सोनं, जाणून घ्या काय आहेत दर)
मायक्रोसॉफ्टने जगभरातील नागरिकांना सावध केले आहे की 'COVID-19' चा शब्दप्रयोग करून लोकांना फिशिंगच्या जाळ्यात ओढले जात आहे. या मेलच्या माध्यमातून नेट्सपोर्ट मॅनेजर नावाची सिस्टिम डाऊनलोड करण्यास सांगितली जाते आणि ती डाऊनलोड केल्यानंतर तुमच्या कम्प्यूटरचा अॅक्सेस या चोरट्यांना मिळतो. भारतात अशाप्रकारच्या चोरीची सर्वात भीती आहे, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Cyber crime, Lockdown