मुंबई, 27 ऑक्टोबर : शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी (Investment in Share Markte) चांगले स्टॉस शोधणे मोठं कठीण काम असतं. त्यात शेअर बाजारात या आठवड्यात जोरदार सुरुवात झाली आहे. मेटल, रिअॅल्टी आणि ऑटो शेअर्सच्या साथीने निफ्टी (Nifty Index) 18,200 चा टप्पा पार करताना दिसत आहे. त्यामुळे सध्या शेअर बाजारात कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी याबाबत SMC GLOBAL SECURITIES च्या क्षितीज गांधी यांनी काही शेअर सुचवले आहे.
डेरिव्हेटिव्ह्ज फ्रंटवर पाहिलं तर, Call रायटर्स 18,200 च्या स्ट्राइकवर त्यांची पोझिशन कव्हर करताना दिसले. तर Put रायटर्स 18,200 च्या स्ट्राईकवर नवीन ओपन इंटरेस्ट जोडताना दिसले. डेरिव्हेटिव्ह आकड्यांवरुन दिसून येतं की येत्या ट्रेडिंग सेशन्समध्ये निफ्टीला अधिक शॉर्ट कव्हरिंग दिसू शकते आणि ते 18,400 लेव्हलवर पुन्हा येऊ शकते. डाऊनसाईडवर, निफ्टीला 18,000 च्या लेव्हलवर स्ट्राँग सपोर्ट आहे. ऑक्टोबर सीरिज एक्सपायरीपूर्वी बाजारात अस्थिरता दिसून येते. आता असे कॉल सांगतो की ज्यात पुढील 2-3 आठवड्यांत मोठी कमाई होऊ शकते.
SMC GLOBAL SECURITIES च्या क्षितिज गांधी यांचा गुंतवणूक सल्ला
AU Small Finance Bank: Buy | LTP: 1,260.95 रुपये
हा स्टॉक 1140 रुपयांच्या स्टॉप लॉससह स्टॉक खरेदी करा आणि 1,450 ची टार्गेट प्राईज ठेवा. या स्टॉकमध्ये 2-3 आठवड्यात 15 टक्के रिटर्न्स मिळू शकतात.
Union Bank of India ची होम लोनवर धमाकेदार ऑफर, अतिशय कमी व्याजदरात मिळेल गृहकर्ज
TCI Express : Buy | LTP: 1,835.75 रुपये
हा स्टॉक 1650 च्या स्टॉप लॉससह खरेदी करा आणि 2,100 चं टार्गेट ठेवा. हा स्टॉक 2-3 आठवड्यात 14.4 टक्के रिटर्न्स देऊ शकतो.
Minda Corporation: Buy | LTP: 139.1 रुपये
हा स्टॉक 122 च्या स्टॉप लॉससह 158 रुपयांच्या टार्गेटसह खरेदी करा. हा स्टॉक 2-3 आठवड्यांत 13.5 टक्के रिटर्न देऊ शकतो.
(Disclaimer:बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. News18Lokmat.com कोणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Share market