मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Mumbai : लाडू उद्योगाचेही येणार 'अच्छे दिन', लवकरच मिळणार IPO चं बळ, Video

Mumbai : लाडू उद्योगाचेही येणार 'अच्छे दिन', लवकरच मिळणार IPO चं बळ, Video

X
Ladoo

Ladoo IPO : देशातील सर्व राज्यांच्या खाद्य संस्कृतीमध्ये आढळणारा प्राचीन पदार्थ म्हणजे लाडू. या उद्योगालाही आता अच्छे दिन येणार आहेत.

Ladoo IPO : देशातील सर्व राज्यांच्या खाद्य संस्कृतीमध्ये आढळणारा प्राचीन पदार्थ म्हणजे लाडू. या उद्योगालाही आता अच्छे दिन येणार आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 24 जानेवारी : देशातील सर्व राज्यांच्या खाद्य संस्कृतीमध्ये आढळणारा प्राचीन पदार्थ म्हणजे लाडू. प्रत्येकाला आपल्या आईच्या, आजीच्या किंवा घरातील इतर व्यक्तींच्या हाताची लाडूची चव आवडत असते. लाडू हे फक्त गोड नसतात तर त्यामधील काही पौष्टिकही असतात. प्रत्येक हंगामानुसार खाण्याचेही लाडू आहेत. मुंबईच्या आहार तज्ज्ञ आणि उद्योजिका सोनाली कोचरेकर यांनी लाडवाचा पारंपरिक व्यवसाय आता सुदृढ केलाय. त्यांच्या लाडू व्यवसायाला आता आयपीएओचं बळ मिळणार आहे.

कसा झाला प्रवास?

बोरिवलीच्या योजना कॉलेजमधून शिक्षण घेतलेल्या सोनाली यांनी फार्मसी आणि न्यूट्रिशन या विषयात एसएनडीटी विद्यापीठातून शिक्षण घेतलंय. त्यांनी अवघ्या चार वर्षांपूर्वी लाडवांचा व्यवसाय सुरू केलाय. आता त्या अडीचशे प्रकारच्या लाडवांसह एकूण 45 खाद्यपदार्थ तयार करतात. देशभरातील दुकानांमध्ये त्यांच्या आठ ब्रँड आता पोहचले आहेत.

वसई -विरारमधल्या दोन कारखान्यांमध्ये उत्पादन घेणाऱ्या सोनाली यांनी सुरूवातीला नोकरी करतच घरात पाच प्रकारचे पौष्टिक लाडू तयार केले. त्यांना त्यांच्या परिचयाच्या व्यक्तींकडून मोठी मागणी येऊ लागली. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी पाच महिलांची मदत घेण्याचं ठरवलं. कोरोना काळात अनेक व्यवसाय संकटात सापडले. त्याचवेळी घरगुती आणि पौष्टिक पदार्थांची मागणी वाढली होती. सोनालींना त्याचा फायदा झाला.

हातगाड्यावर सुरूवात झालेला 'लक्ष्मीनारायण चिवडा' कसा बनला जागतिक ब्रँड? पाहा Video

लाडू विक्री जोरात सुरू होती. घरी हा उद्योग वाढविण्याला मर्यादा होत्या. त्याचबरोबर व्यवसायाला लागणारं मोठं भांडवल उभारण्याचंही आव्हान होतं. त्यावेळी केंद्र आणि राज्य सरकारकडून लघू उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनांची सोनालींनी मदत घेतली. त्यांनी घराच्या बाहेर पडून वसई आणि विरारमध्ये कारखाने सुरु केले.

IPO चं बळ

सोनाली कन्झ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड ही त्यांची कंपनी आता पब्लिक लिमिटेड कंपनी झालीय. त्यामध्ये 70 टक्के महिला कर्मचारी आहेत. मुंबईसह पुणे, नाशिक, दिली या शहरांमधील 350 दुकानांमध्ये त्यांची उत्पादनं विकली जातात. पौष्टिक लाडवामुळे जीवनसत्व, प्रथिने आपल्या शरिराला पुरेशा प्रमाणात मिळतात, असे आहारतज्ज्ञ सोनाली सांगतात.

सोनाली यांच्या कंपनीचा आयपीओचे लवकरच मुंबई शेअर बाजारा लिस्टिंग होणार आहे. या लिस्टिंगचं 90 टक्के काम सध्या पूर्ण झालंय. येत्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये कंपनीचे शेअर्स सर्वांसाठी खुले होणार असल्याचं सोनाली यांनी सांगितलं.

First published:

Tags: Local18, Local18 food, Mumbai, Share market