मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ग्राहकांसाठी मोठी बातमी! 'या' बँकेनं वाढवलं FD वरचं व्याजदर, पाहा किती मिळणार

ग्राहकांसाठी मोठी बातमी! 'या' बँकेनं वाढवलं FD वरचं व्याजदर, पाहा किती मिळणार

आयसीआयसीआय बँकेनं 61 दिवसांपासून ते 90 दिवसांसाठी फिक्स डिपॉझिट ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे.

आयसीआयसीआय बँकेनं 61 दिवसांपासून ते 90 दिवसांसाठी फिक्स डिपॉझिट ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे.

आयसीआयसीआय बँकेनं 61 दिवसांपासून ते 90 दिवसांसाठी फिक्स डिपॉझिट ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : आयसीआयसीआय बँकेनं 61 दिवसांपासून ते 90दिवसांसाठी फिक्स डिपॉझिट ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. ही रक्कम मोठी असायला हवी एवढीच बँकेनं अट ठेवली आहे. बँक अशा ग्राहकांना 6 टक्क्यांनी व्याज देत आहे.

ICICI बँकेने 61 दिवस ते 90 दिवसांच्या विशिष्ट कालावधीसाठी 2 कोटी ते 5 कोटी रुपयांच्या मोठ्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 25 बेस पॉइंट्स किंवा 0.25 टक्के वाढवलं आहे. ICICI बँकेने गेल्या आठवड्यात 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर FD दरात 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. RBI ने रेपो रेट 5.9% पर्यंत वाढवल्यानंतर FD दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ICICI बँक 2 कोटी ते 5 कोटी रुपयांच्या FD वर 61 दिवस ते 90 दिवसांसाठी 5.25% दराने व्याज देईल. पूर्वी येथे 5 टक्के व्याजदर होता. त्यामुळे या कालावधीत 0.25% व्याज वाढले आहे. हा नियम 4 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आला आहे.

आता घराबाहेरच नाही तर नुसतं घरात राहणंही महाग

एकीकडे बँकेनं EMI आणि कर्ज वाढवलं आहे. RBI ने व्याजदरात वाढ केल्यामुळे बँकांनीही कर्जाचे दर आणि EMI वरील व्याजदर वाढवले आहेत. तर दुसरीकडे मोठ्या रकमेची FD ठेवणाऱ्यांसाठी देखील व्याजदर वाढवण्यात आले आहेत. हा नियम जेष्ठ नागरिकांना देखील लागू होणार असल्याचं बँकेनं सांगितलं आहे.

सध्या ICICI बँक 7 दिवस ते 29 दिवसांच्या कालावधीसाठी 3.75% दराने व्याज देते. तर हा दर 30 दिवस ते 45 दिवसांसाठी 3.9% आणि 46 दिवस ते 60 दिवसांच्या कालावधीसाठी 4.25% आहे. दरम्यान, जर एखाद्याला 91 दिवस ते 184 दिवसांच्या कालावधीसह बल्क एफडीवर 5.5% पर्यंत व्याजदर मिळू शकतो. तर 185 दिवस ते 270 दिवसांच्या कालावधीवरील व्याज दर 5.75% आहे.

दिवाळीत मिळणाऱ्या बोनस आणि गिफ्टवर द्यावा लागणार टॅक्स? काय सांगतो नियम

याशिवाय, बँक 271 दिवसांपासून ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 6% दर देते. 1 वर्ष ते 10 वर्षे मुदतीच्या FD वर सर्वाधिक व्याज दर 6.25% आहे. ICICI बँक FD चा कालावधी किमान 7 दिवस ते कमाल 10 वर्षांचा असतो.

First published:

Tags: Icici bank