मराठी बातम्या /बातम्या /मनी /HDFC Life पॉलिसीहोल्डर्सना देणार 2180 कोटी रुपयांचा बोनस! तुम्हाला मिळणार की नाही, इथे तपासा पात्रता

HDFC Life पॉलिसीहोल्डर्सना देणार 2180 कोटी रुपयांचा बोनस! तुम्हाला मिळणार की नाही, इथे तपासा पात्रता

देशातील सर्वात मोठ्या खाजगी लाइफ इन्शुरन्स कंपन्यापैकी एक असणाऱ्या HDFC Life Insurance Limited ने त्यांच्या पार्टिसिपेटिं प्लान्सच्या पॉलिसीहोल्डर्ससाठी 2180 कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे.

देशातील सर्वात मोठ्या खाजगी लाइफ इन्शुरन्स कंपन्यापैकी एक असणाऱ्या HDFC Life Insurance Limited ने त्यांच्या पार्टिसिपेटिं प्लान्सच्या पॉलिसीहोल्डर्ससाठी 2180 कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे.

देशातील सर्वात मोठ्या खाजगी लाइफ इन्शुरन्स कंपन्यापैकी एक असणाऱ्या HDFC Life Insurance Limited ने त्यांच्या पार्टिसिपेटिं प्लान्सच्या पॉलिसीहोल्डर्ससाठी 2180 कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे.

नवी दिल्ली, 24 जून: देशातील सर्वात मोठ्या खाजगी लाइफ इन्शुरन्स कंपन्यापैकी एक असणाऱ्या एचडीएफसी लाइन इन्शुरन्स लिमिटेड (HDFC Life Insurance Limited) ने त्यांच्या पार्टिसिपेटिं प्लान्सच्या पॉलिसीहोल्डर्ससाठी 2180 कोटी रुपयांचा बोनस (Bonus) जाहीर केला आहे. ही रक्कम गेल्या वर्षीच्या रकमेपेक्षा 44% अधिक आहे. या बोनसचा फायदा HDFC Life च्या 15.49 लाख पॉलिसीहोल्डर्सना मिळेल.

2180 कोटी रुपयांच्या बोनसपैकी 1438 कोटी रुपये पॉलिसीहोल्डर्सना यावर्षी मॅच्युअर होणाऱ्या पॉलिसीच्या बोनस स्वरुपात किंवा कॅश बोनसच्या स्वरुपात मिळतील. तर उर्वरित बोनस अमाउंट भविष्यात जेव्हा पॉलिसी मॅच्युअर होईल, किंवा डेथ किंवा पॉलिसी सरेंडर झाल्यावर मिळेल.

HDFC Life च्या सीईओ विभा पडाळकर यांनी असं म्हटलं आहे की, पॉलिसीहोल्डर्ससाठी बोनस जाहीर करताना त्यांना आनंद होत आहे. एचडीएफसी लाइफबाबत विश्वास व्यक्त केल्याने त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. एचडीएफसी लाइफ ही कंपनी एचडीएफसी बँकेची (HDFC Bank) सहयोगी कंपनी म्हणून 2000 साली स्थापन करण्यात आली होती. दरम्यान जाहीर करण्यात आलेल्या बोनसबाबत बोलायचं झालं तर हा बोनल सर्व पॉलिसीहोल्डर्सना मिळणार नाही. याचा फायदा केवळ प्रॉफिटमध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या पॉलिसीच्या विमाधारकांना मिळेल. शिवाय याचा फायदा यूनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (ULIPS) ना मिळणार नाही, कारण ते मार्केट लिंक्ड प्लॅन आहेत.

हे वाचा-सलग तिसऱ्या दिवशी झळाळी, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 10600 रुपये स्वस्त आहे सोनं

दरम्यान Endowment आणि Money Back प्लॅनचे पॉलिसीहोल्डर्स ज्यांनी प्रॉफिटमध्ये पार्टिसिपेट करण्याचा पर्याय निवडला आहे, त्यांना देखील हा बोनस मिळेल. या बोनसचा फायदा HDFC Life चा एचडीएफसी मनी बॅक प्लॅन (HDFC Money Back Plan) घेणाऱ्या पॉलिसीधारकांना मिळेल.

याशिवाय एचडीएफसी चिल्ड्रन प्लॅन (HDFC Childrens Plan), एचडीएफसी इंडोमेंंट अशुरन्स (HDFC Endowment Assurance) सह एचडीएफसी सेव्हिंग अशुरन्स प्लॅन (HDFC Savings Assurance Plan) आणि एचडीएफसी अशुरन्स प्लॅन (HDFC Assurance Plan) च्या पॉलिसीधारकांना फायदा मिळेल.

First published:

Tags: Hdfc bank, Insurance