Home /News /money /

नितीन गडकरींनी दिली आनंदाची बातमी; या क्षेत्रात तब्बल 5 कोटी रोजगाराच्या संधी

नितीन गडकरींनी दिली आनंदाची बातमी; या क्षेत्रात तब्बल 5 कोटी रोजगाराच्या संधी

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अनेक जणांवर बेरोजगाराचा डोंगर कोसळला आहे. यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एक चांगली बातमी दिली आहे.

    नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अनेक जणांवर बेरोजगाराचा डोंगर कोसळला आहे. यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एक चांगली बातमी दिली आहे. गडकरींनी सांगितले की येत्या पाच वर्षात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME Sector) क्षेत्रात 5 कोटींहून अधिक रोजगाराच्या संधी (Employment Opportunity) निर्माण करण्याचं सरकारचं लक्ष्य आहे.  एमएसएमई, रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री गडकरी यांनी सांगितले की, त्यांचं लक्ष्य सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी)  MSME चे  योगदान 30 टक्क्यांनी वाढवून 50 टक्क्यांपर्यंत केले जावे आणि निर्यात 49 टक्क्यांनी वाढवून 60 टक्क्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व एमएसएमई क्षेत्रातून तब्बल 11 कोटी लोकांना रोजगार मिळू शकतो. हे ही वाचा-PM शेतकरी सन्मान योजनेमध्ये 110 कोटींचा घोटाळा, 80 अधिकारी बरखास्त पुढे गडकरी म्हणाले की, इनोवेशन आणि आंत्रप्रेन्योरशिप (Innovation & Entrepreneur) यांना दिली जाणारी मदत अधिक व्यापक करण्याची गरज आहे. त्यामुळे नवीन प्रतिभाशाली लोकांना पुढे जाण्याची संधी मिळेल. एमएसएमई मंत्रालयाकडून जारी केलेल्या वक्तव्यानुसार गडकरींनी सांगितले की, इनोवेशनमध्ये अधिक शोध करीत नवनवीय पर्याय शोधण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. एमएसएमई हे क्षेत्र देशातील विकासाचं इंजिन आहे, आणि त्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. मला खात्री आहे नवी कल्पना या क्षेत्राला अधिक संपन्न करण्यासाठी मदत करेल. हे ही वाचा-PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! आता तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार 7 लाखांचा फायदा अटल न्यू इंडिया चॅलेंजचं कौतुक  गडकरींनी बुधवारी एका वर्च्युअल बैठकीला संबोधित करताना नीती आयोगाच्या आत्मनिर्भर भारत अरायज अटल न्यू इंडिया चॅलेंजचं कौतुक केलं. त्यांनी विविध क्षेत्रातील सुरू असलेल्या अडचणींवर उपाय शोधण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी सरप्लस तांदळाचं उदाहरण दिलं आणि सांगितलं की याचा उपयोग इथेनॉलच्या उत्पादनात केलं जाऊ शकतो. यामुळे हरित इंधनात देशाला जीवाश्म इंधानांचां पर्याय समोर असेल. गडकरी पुढे म्हणाले की देशाच्या विकासाला भविष्यात तेव्हाच गती मिळेल जेव्हा देशात मागास आणि आदिवासी भाग यामध्ये सहभागी होती. कोरोनाच्या काळात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठं नुकसान झालं आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात मोठा घट झाली आहे. येत्या काळातही अर्थव्यवस्थेबाबत योग्य तो निर्णय घेण्यात आला नाही, तर मोठा झटका सहन करावा लागू शकतो. भारताबरोबरच जगातील इतर देशांमध्येही कमी जास्त प्रमाणात अर्थव्यवस्थेची हिच परिस्थिती आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या