आयटी क्षेत्राचे वाईट दिवस संपले, 'या' 4 मोठ्या कंपन्यांमध्ये आहेत व्हेकन्सीज्

आयटी क्षेत्राचे वाईट दिवस संपले, 'या' 4 मोठ्या कंपन्यांमध्ये आहेत व्हेकन्सीज्

हायरिंगमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत 300 टक्के वाढ झालीय.

  • Share this:

मुंबई, 16 मे : आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांसाठी किंवा करियर करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सध्या मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये नोकरीसाठी जोरदार भरती सुरू आहे. मीडिया रिपोर्टसनुसार टीसीएस आणि इन्फोसिस यांसारख्या मोठ्या कंपनीत नोकरीसाठी जागा जलद भरतेय. दोन्ही कंपनींमध्ये गेल्या आर्थिक वर्षात अनेक नोकऱ्या उपलब्ध झाल्यात. हायरिंगमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत 300 टक्के वाढ झालीय. इकाॅनाॅमिक टाइम्समध्ये छापलेल्या बातमीनुसार आयटी क्षेत्रात अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना अपेक्षित कौशल्य न दिसल्यानं काढून टाकतेय. कंपन्या नवी नोकरी देताना उमेदवारात नव्या जमान्याच्या कौशल्याची अपेक्षा ठेवतं.

घर विकून सुरू केला होता 'हा' व्यवसाय, आता कमवतायत महिन्याला 1 कोटी रुपये

नोकरीत जोरदार होतेय वाढ

देशातल्या 4 सर्वोत्कृष्ट कंपन्यांमधली नोकर भरती गेल्या 8 वर्षांपेक्षा सर्वात जास्त आहे.

टाटा कन्सल्टिंग सर्विसेस ( TCS ), इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल टेक्नाॅलाॅजीस या कंपन्यांमध्ये नेट हायरिंगमध्ये हायरिंग वाढलीय.

रेल्वेनं प्रवास करत असताना तुम्ही उतरण्याआधी तुम्हाला येईल 'हा' मेसेज

2013पासून 2018पर्यंत या कंपन्यांमध्ये दर वर्षी 70 हजारहूनही कमी लोकांची भरती झाली होती. पण यावर्षी हा आकडा 78,500 पर्यंत पोचलाय. या आकड्यापेक्षा जास्त नोकर भरती 2012मध्ये पाहायला मिळाली होती.

महाराष्ट्राला 4 वर्षानंतर मिळू शकतं उपमुख्यमंत्रिपद, कोण मारणार बाजी?

कंपनींच्या या नोकर भरतीमुळे ही गोष्ट लक्षात येते की आयटी क्षेत्रात भविष्यातही मागणी वाढणार आहे.

या चार कंपन्यांमध्ये मार्च 2019पर्यंत एकूण कर्मचारी 9.6 लाख आहेत. एक वर्षांपूर्वीच्या तुलनेत ही वाढ 8.9 टक्के आहे. या कंपन्यांच्या मिळकतीमध्येही वाढ होतेय.

500च्या नव्या नोटांचे पडले तुकडे, VIDEO समोर आल्यानं खळबळ

First published: May 16, 2019, 2:20 PM IST

ताज्या बातम्या