घर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर, आता द्यावी लागेल कमी किंमत

घर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर, आता द्यावी लागेल कमी किंमत

घर खरेदी करताना पार्किंगची जागा, स्वीमिंग पूल यांचे अतिरक्त दर घेतले जातात. पण यात आता बदल होतोय.

  • Share this:

मुंबई,05 मे : अथाॅरिटी आॅफ अॅडव्हान्स रुलिंग ( एएआर )च्या पश्चिम बंगालच्या एका खटल्यात असा निर्णय केला गेला की फ्लॅट विकताना कार पार्किंग, स्वीमिंग पूल, क्लब जिम यांसारख्या सुविधांना सेवा मानता येणार नाही. म्हणून या सेवांवर 18 टक्के जीएसटी वसून करणं चुकीचं म्हटलंय. यांच्या मते या सर्व सेवांना अॅडव्हान्स कंस्ट्रक्शन सर्विस मानलं जायला हवं. आणि यावर जीएसटी कमी लागणार. या सेवांना कम्पोझिट कन्स्ट्रक्शन सर्विसेस मानलं जातं.

अपत्याच्या नावे रोज करा 100 रुपयांची बचत, 15 वर्षांनी होईल 34 लाखांचा मालक

या सेवांवर 12 टक्के किंवा 5 टक्के दरानं जीएसटी लागेल. इतर अनेक सेवांवर जीएसटी 18 टक्के आहे. एएआरनं आपल्या निर्णयामध्ये सांगितलंय की कम्पोझिट सप्लायही कन्स्ट्रक्शन सर्विसप्रमाणे मुख्य पुरवठादार आहे.

‘या बाईने माझ्या भावाला फसवलंय’, मान्यतासाठी प्रियाने संजय दत्तला सुनावलं

एएआयनं हा निर्णय बंगाल पियरलेस हाउसिंग डेव्हलपमेंटच्या याचिकेवर ऐकवला आहे. प्राॅपर्टी तज्ज्ञांच्या मते याचा फायदा घर खरेदी करणाऱ्या सगळ्यांना होणार आहे.

विवाहबाह्य संबंध, पैशांची उधळपट्टी; मोठ्या भावानं कुटुंबासमोर लहान भावाला घातल्या गोळ्या

सध्या 50 लाख रुपयांच्या फ्लॅट खरेदीवर कार पार्किंग, जिम, स्वीमिंग पूल यासाठी 6 ते 7 लाख रुपये अतिरिक्त घेतले जातात. यावर 18 टक्के जीएसटी म्हणजे 108000 रुपयांपासून 126000 रुपये भरावे लागतात. आता 12 टक्के झाल्यानं ही रक्कम 72000 रुपयांपासून 84000 रुपयांपर्यंत द्यावी लागेल. आता एकूण बचत 36 हजार रुपयांपासून 42 हजार रुपयांपर्यंत होईल. अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये 5 टक्क्यांच्या दराच्या हिशेबानं 20 लाख रुपयांपर्यंतच्या फ्लॅटवर 13 टक्के बचत होईल. एकूण बचत 39 हजार रुपयांपर्यंत होईल.


SPECIAL REPORT: बच्चे कंपनीची राजकीय जुगलबंदी, '...लाव रे तो व्हिडिओ'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 5, 2019 03:51 PM IST

ताज्या बातम्या