दसरा-दिवाळीआधी सर्वसामन्यांसाठी आनंदाची बातमी, स्वस्त झाल्या 'या' महागड्या गोष्टी

दसरा-दिवाळीआधी सर्वसामन्यांसाठी आनंदाची बातमी, स्वस्त झाल्या 'या' महागड्या गोष्टी

सुकामेव्याच्या बाजारात ऑक्टोबर महिन्यात मोठी तेजी असते. मात्र यंदा कित्येक वर्षांनंतर या हंगामात सुकामेव्याचे दर घसरले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर : सुकामेव्याचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी या दिवाळीत बाजारातील चित्र वेगळं असण्याची शक्यता आहे. थंडीच्या दिवसात मोठी मागणी असलेल्या आणि दिवाळीमध्ये गिफ्ट दिल्या जाणाऱ्या सुकामेव्याच्या बाजारात ऑक्टोबर महिन्यात मोठी तेजी असते. मात्र यंदा कित्येक वर्षांनंतर या हंगामात सुकामेव्याचे दर घसरले आहेत.

दिल्लीत सुकामेव्याचे घाऊक आणि किरकोळ व्यापारी मौहम्मह आजम यांनी याबाबत न्यूज18शी बोलताना सांगितलं की, 'आम्ही 90 वर्षांपासून या व्यवसायात आहोत. परंतु बाजारातील अशाप्रकारची स्थिती यापूर्वी कधीही पाहिली नाही. थंडीचे दिवस आणि दिवाळी पाहता बाजारात मोठी तेजी असते. त्याशिवाय लग्नसमारंभासाठी अनेक ऑर्डर येतात. परंतु यंदा सुकामेव्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसातही सुकामेव्याच्या किंमती, अशाप्रकारे कमी होत नसल्याचं' ते म्हणाले.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन बदाम 900 ते 600 रुपये किलोवर आला आहे. तर काजू 1100 ते 950 रुपये किलोवर पोहचला आहे. पिस्ता 1400 ते 1100 रुपये किलो, तर किसमिसची 400 रुपये किलोवरुन 350 रुपयांवर विक्री होत आहे.

हे वाचा - Gold Price Today:सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात घसरण; 50 हजाराहून कमी 10 ग्रॅमचा दर

मिठाईच्या ऑर्डरमध्येही मोठी घट

मिठाई दुकानांच्या व्यवसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या एक महिना आधी सुवामेवा, खवा, दूध आणि इतर वस्तूंच्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर येण्यास सुरुवात होते. त्याशिवाय कामगारांची संख्याही वाढवली जाते. परंतु यंदा पहिल्यांदाच दिवाळी अगदी तोंडावर आली असतानाही, मिठाईची 10 टक्केही ऑर्डर आली नसल्याचं, सांगण्यात आलं आहे. दिवाळीमध्ये दरवर्षी मोठ्या ग्राहकांकडून येणारी ऑर्डरही यंदा आली नाही. दिवाळीत सुकामेव्याचे गिफ्ट पॅकही मोठ्या प्रमाणात तयार करण्यात येतात, मात्र यंदा तेथेही मोठी घट झाल्याचं व्यसायिकांनी सांगितलं आहे.

हे वाचा - पीएफचे पैसे रिटायरमेंटपूर्वीच काढल्यास होऊ शकतं नुकसान; जाणून घ्या EPFOचा नियम

Published by: Karishma Bhurke
First published: October 8, 2020, 1:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या