Home /News /money /

यावर्षी लवकर असणार Amazon Prime Day Event, वाचा काय आहेत तारखा

यावर्षी लवकर असणार Amazon Prime Day Event, वाचा काय आहेत तारखा

अगदी सुईपासून टीव्हीपर्यंत हजारो वस्तुंची डिलिव्हरी करणारा ई-कॉमर्स जायंट अमेझॉनने (Amazon) यावर्षी भारतात होणारा प्राइम डे सेल (Prime Day Sale) लवकर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या तारखाही अमेझॉनने जाहीर केल्या आहेत.

    मुंबई, 29 सप्टेंबर : अगदी सुईपासून टीव्हीपर्यंत हजारो वस्तुंची डिलिव्हरी करणारा ई-कॉमर्स जायंट अमेझॉनने (Amazon) यावर्षी भारतात  होणारा प्राइम डे सेल (Prime Day Sale) लवकर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या तारखाही अमेझॉननी जाहीर केल्या आहेत. 13 आणि 14 ऑक्टोबर 2020 या तारखांना अमेझॉनचा वार्षिक प्राइम डे इव्हेंट (Amazon Prime Day Event) होणार आहे. अमेझॉनने 2015 पासून भारतात दोन दिवसांचा ऑनलाइन सेल आयोजित करायला सुरुवात केली. या सेलला ग्राहक प्रचंड प्रतिसाद देतात आणि अनेकजण त्याची वाट पाहत असतात. यावर्षी कोरोनामुळे अमेझॉनला हा सेल पुढे ढकलावा लागला होता. काय असणार विशेष? कोरोना संकटकाळात लॉकडाऊन लागू केल्यानंतर आता सुरू करण्यात आलेल्या अनलॉकमध्ये हळूहळू ऑनलाइन विक्रीला सरकारकडून परवानगी देण्यात आली. त्याचबरोबर दुकानंही हळूहळू उघडत आहेत. त्यामुळे अमेझॉननी हा सेल जाहीर केला आहे. अमेझॉन प्राइमच्या सदस्यांना अमेझॉनच्या या सेलमध्ये भाग घ्यायची संधी मिळते. या सेलमध्ये सर्व वस्तुंवर आकर्षक आणि मोठ्या प्रमाणात सूट दिली जाते. त्यामुळे ग्राहक मनसोक्त खरेदीचा आनंद लुटतात. (हे वाचा-खरीप पिकाच्या विक्रीनंतर शेतकऱ्यांना त्वरित मिळणार पैसे, सरकारचा मोठा निर्णय) महिन्याचे 129 रुपये किंवा वार्षिक 999 रुपये भरून कोणताही ग्राहक अमेझॉन प्राइमचा सदस्य होऊ शकतो. प्राइमच्या सदस्यांसाठी वेगळ्या डील, वस्तुंवर मोठी सूट आणि एंटरटेनमेंट सेवा अमेझॉन प्राइमचाही वापर करता येतो. त्याचबरोबर अमेझॉनच्या या सेलमध्ये भाग घेण्याची संधी मिळते. आणखी एक फायदा म्हणजे या सदस्यांना अमेझॉनवरून खरेदी केलेल्या वस्तुंची मोफत डिलिव्हरीही मिळते. (हे वाचा-SBI ग्राहकांना देत आहे होम, कार आणि पर्सनल लोनवर ऑफर! असा घ्या फायदा) स्मार्टफोन, फॅशनवेअर, फुटवेअर, कॉस्मेटिक्स, स्मार्ट एलईडी टीव्ही, खेळणी अशा अनेक गोष्टी अमेझॉनवर उपलब्ध असतात. ग्राहक या सेलची आतुरतेनी वाट पाहत असतात आणि अक्षरश: खरेदीसाठी वस्तुंवर तुटून पडतात. दसरा दिवाळीच्या सिझनमुळे यंदाच्या सेलसाठीही ग्राहक आणि कंपनी दोघेही सज्ज झाले आहेत.  
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या