बजेटनंतर स्वस्त होऊ शकतं सोनं, सरकारला दिला हा सल्ला

बजेटनंतर स्वस्त होऊ शकतं सोनं, सरकारला दिला हा सल्ला

भारतात सोन्याची सगळ्यात जास्त आयात होते आणि प्रामुख्याने दागिन्यांच्या उद्योगासाठी सोनं आयात केलं जातं. देशभरातली दरवर्षाची सोन्याची आयात 800 ते 900 टन आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 जानेवारी : वाणिज्य मंत्रालयाने (Ministry of Commerce) आगामी अर्थसंकल्पात सोन्यावरचं आयात शुल्क हटवण्याची मागणी केली आहे. रत्नं आणि दागिने बनवणं आणि निर्यात वाढवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाणिज्य मंत्रालयाने अर्थसंकल्पाच्या दृष्टीने ज्या सूचना सुचवल्या आहेत त्यामध्ये आयात शुल्क घटवण्याचा विचार करण्याची सूचना दिली आहे. मागच्या अर्थसंकल्पात सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून ते 12.5 टक्के करण्यात आलं होतं.

2019 मध्ये सोन्याच्या आयातीत घट

रत्न आणि दागिन्यांच्या निर्यात उद्योगातल्या प्रतिनिधींनी हे 4 टक्के करण्याची मागणी केली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार,देशात होणारी सोन्याची आयात चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते नोव्हेंबर या काळात 7 टक्क्यांनी घटून 20. 57 अब्ज डॉलर झाली. 2018 - 2019 या आर्थिक वर्षात हा आकडा 22. 16 अब्ज डॉलर झाला.

(हेही वाचा : खूशखबर! सलग तिसऱ्या दिवशी घसरले सोन्याचे भाव)

भारतात सोन्याची आयात जास्त

भारतात सोन्याची सगळ्यात जास्त आयात होते आणि प्रामुख्याने दागिन्यांच्या उद्योगासाठी सोनं आयात केलं जातं. देशभरातली दरवर्षाची सोन्याची आयात 800 ते 900 टन आहे. त्याचवेळी रत्नं किंवा दागिन्यांची निर्यात एप्रिल ते नोव्हेंबर या काळात दीड टक्क्यांनी घटून 20.5 अब्ज डॉलरवर आली.

व्यापारातली घट हे आव्हान

सोन्याच्या आयातीत घट झाली तर देशातल्या व्यापारातली घट कमी करण्यात मदत होईल. 2019-20 च्या एप्रिल ते नोव्हेंबर या काळात व्यापारातलं नुकसान कमी होऊन ते 106.84 अब्ज डॉलरवर आलंय. एक वर्ष आधी व्यापारातलं नुकसान 133.74 अब्ज डॉलरवर आलं होतं.

(हेही वाचा : तुमच्या SBI खात्यात ही माहिती अपडेट करा नाहीतर पैसे काढणं होणार कठीण)

================================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldmoney
First Published: Jan 13, 2020 09:18 PM IST

ताज्या बातम्या