मराठी बातम्या /बातम्या /मनी /2000 रुपयांनी सोनं तर 9000 रुपयांनी घसरली चांदी, एका आठवड्यात का उतरले दर?

2000 रुपयांनी सोनं तर 9000 रुपयांनी घसरली चांदी, एका आठवड्यात का उतरले दर?

या आठवडाभरामध्ये सोन्याच्या दरात 2000 रुपये प्रति तोळा घसरण झाल्याचे दिसते. तर चांदीचे भाव जवळपास 9000 रुपये प्रति किलोने उतरले आहेत.

या आठवडाभरामध्ये सोन्याच्या दरात 2000 रुपये प्रति तोळा घसरण झाल्याचे दिसते. तर चांदीचे भाव जवळपास 9000 रुपये प्रति किलोने उतरले आहेत.

या आठवडाभरामध्ये सोन्याच्या दरात 2000 रुपये प्रति तोळा घसरण झाल्याचे दिसते. तर चांदीचे भाव जवळपास 9000 रुपये प्रति किलोने उतरले आहेत.

मुंबई, 26 सप्टेंबर : या आठवड्यामध्ये सोन्याचांदीची झळाळी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. सोन्याचांदीचे दर (Gold Silver Rates) उतरले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या मौल्यवान धातूंमध्ये एवढी घसरण पाहायला मिळाली नव्हती. मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारी सोन्याची वायदे किंमत (Gold Future) 238 रुपयांनी कमी होऊन दर 49,666 रुपये प्रति तोळावर आले होते. तर चांदीची वायदा किंमत देखील 1 टक्क्यांनी उतरली आहे. यानंतर चांदी  59,018 रुपये प्रति किलोग्रामवर आली आहे.

एकूण आठवडाभरामध्ये सोन्याच्या दरात 2000 रुपये प्रति तोळा घसरण झाल्याचे दिसते. तर चांदीचे भाव जवळपास 9000 रुपये प्रति किलोने उतरले आहेत. ब्रोकरेज हाऊसचे असे म्हणणे आहे की सोन्याचे भाव 49,250 पेक्षा खाली आले आहेत, याचा अर्थ असा होतो की आता सोन्याचे दर 48900 किंवा 48800 रुपयांवर ट्रेड करतील.

आंतरराष्ट्रीय बाजारात 15 टक्क्यांनी स्वस्त झाली चांदी

आंतरराष्ट्रीय बाजारात (Global Market) मार्चनंतर चांदीमध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळते आहे. गेल्या एका आठवड्यामध्येच सोने 4.6 टक्क्याने तर चांदी 15 टक्क्याने स्वस्त झाली आहे. विश्लेषकांच्या मते डॉलरमध्ये आलेली तेजी आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेबाबत अनिश्चिततेची परिस्थिती असल्यामुळे मौल्यवान धातूंच्या किंमती उतरत आहेत.

वाढणारी महागाई मोठी समस्या

वाढणाऱ्या महागाईपासून थोडीफार मदत मिळावी यासाठी देखील सोन्यामध्ये गुंतवणूक केली जाते. मात्र आर्थिक रिकव्हरी सुस्त असल्याने महागाई आणखी वाढण्याची शंका व्यक्त करण्यात येते आहे. गेल्या आठवड्यात डॉलरचे मुल्य दोन महिन्यातील सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. ज्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होतो आहे.

(हे वाचा-सरकारने बदलले National Pension System चे नियम, कोट्यवधी लोकांना होणार फायदा)

काही विश्लेषकांच्या मते सोन्याच्या दरामध्ये झालेली ही घसरण काही कालावधीपुरतीच असेल. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमुळे  (US Presidential Election)देखील अनिश्चितता आहे. दुसरीकडे इकॉनॉमिक आऊटलुक देखील पॉझिटिव्ह संकेत देत नाही आहे आणि भू-राजकीय तणाव (Geo-political Tension)देखील सोन्याच्या मागणीवर परिणाम करत आहे.

अमेरिकेतील प्रोत्साहन पॅकेजमुळे डॉलरला मजबुती मिळेल

अशी शक्यता आहे की येणाऱ्या काही दिवसात अमेरिकेत आणखी एक प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले जाईल. यामुळे डॉलरमध्ये मजबुती येण्याची शक्यता आहे. अमेकन सरकार 2.4 ट्रिलियन डॉलरच्या पॅकेजवर काम करत आहे. पुढील आठवड्यात याबाबत घोषणा केली जाऊ शकते.

First published:

Tags: Gold, Gold and silver prices today