Home /News /money /

Gold Sovereign : रक्षाबंधनच्या दिवशी स्वस्तात सोनं खरेदीची संधी; बहिणीला द्या सरकारी गॅरंटीचे सोनं

Gold Sovereign : रक्षाबंधनच्या दिवशी स्वस्तात सोनं खरेदीची संधी; बहिणीला द्या सरकारी गॅरंटीचे सोनं

रक्षाबंधनाच्या दिवशीच सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीमचा पाचवा टप्पा सुरू होणार आहे. सरकारने हे गोल्ड बाँड्स जारी केले आहेत. ऑनलाईन खरेदीवर सवलतही आहे.

    नवी दिल्ली, 03 ऑगस्ट : देशभरामध्ये रक्षाबंधनाचा सण 3 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. याच दिवशी सरकारी योजना असणार सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीमचा पाचवा टप्पा (ल) सुरू होणार आहे. यादिवशी तुम्ही तुमच्या बहिणीला हे खास गिफ्ट देऊ शकता. या टप्प्यातील गोल्ड बाँडसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इश्यू प्राइस 5,334 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली आहे. कोरोनाच्या संकटकाळात सोन्याच्या किंमती गगनाला भिडत आहे. अशावेळी सरकारकडून जारी करण्यात येणारे सॉव्हरेन गोल्ड बाँड अत्यंत सुरक्षित असल्याची माहिती जाणकार देतात. दरम्यान येणाऱ्या काळात सोन्याच्या किंमती प्रति तोळा 60 हजार पार करण्याची दाट शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या सोन्याचे भाव रेकॉर्ड स्तरावर आहेत. याचा फायदा सॉव्हरेन गोल्ड बाँडमधील गुंतवणूकदारांना होत आहे. गुंतवणुकदाराना 20 दिवसात 12 टक्के रिटर्न मिळाला आहे. गेल्या चार वर्षात जवळपास 80 टक्के रिटर्न मिळाला आहे. सॉव्हरेन गोल्ड बाँडच्या किंमती सोन्याच्या किंमतींशी संबधित असतात. जसे सोन्याचे भाव वाढतात, त्याचवेळी तुमची गुंतवणूक देखील तेजीत जाते. (हे वाचा-तुमच्या पगारासंबंधित महत्त्वाचा नियम आजपासून बदलणार, वाचा काय होणार बदल) गोल्ड ईटीएफच्या तुलनेत या योजनेत कोणतेही वार्षिक शुल्क द्यावे लागत नाही. या बाँडच्या आधारे तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता. हे बाँड पेपर आणि इलेक्ट्रॉनिक फॉरमॅटमध्ये असतात. त्यामुळे त्यांना फिजिकल गोल्ड प्रमाणे लॉकरमध्ये ठेवण्यासाठी खर्च देखील करावा लागत नाही. कशी मिळते सरकारी गॅरंटी? आरबीआय भारत सरकारतर्फे हे बाँड जारी करत आहे. भारत बुलियन अँड असोसिएशन लिमिटेडकडून गोल्ड बाँड जारी करण्याच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या 3 व्यवहाराच्या दिवसात 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीच्या आधारे या बाँडच्या किंमती ठरतात. 6 जुलै 2020 ते 10 जुलै 2020 पर्यंत दरमय्ना असणाऱ्या टप्प्यात सॉव्हरेन गोल्ड बाँडची  किंमत (SGB Issue Price) 4,852 रुपये प्रति ग्रॅम होती. या योजनेचे इतर फायदे 2015 मध्ये ही योजना पहिल्यांदा जारी करण्यात आली होती. जेणेकरून बाजारातील फिजिकल सोन्याची मागणी कमी करता येईल. देशांतर्गत बाजारात आर्थिक बचत करणे हा देखील यामागचा एक हेतू होता. यामध्ये गुंतवणूक करताना तुम्ही एका आर्थिक वर्षामध्ये 500 ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करू शकता. कमीतकमी गुंतवणूक 1 ग्रॅमची आहे. (हे वाचा-सोन्याचे भाव लवकरच 56 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता) यामध्ये गुंतवणूकदारांना टॅक्समधून सूट देखील मिळते. गुंतवणूकदार या स्कीममधून कर्ज देखील घेऊ शकतात. गोल्ड बाँडवर गुंतवणूक करणाऱ्यांना वार्षिक 2.5 दराने व्याज मिळेल. या बाँडवर मिळणाऱ्या व्याजाला सब्सक्राइबर्स च्या उत्पन्नात जोडले जाईल, त्यावर त्याला टॅक्स द्यावा लागेल. ऑनलाइन खरेदीवर अतिरिक्त सूट याचप्रमाणे हे सोने खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर केल्यास तुम्हाला आणखी सूट देखील मिळणार आहे. यावेळी जारी करण्यात आलेल्या सोन्याच्या बाँडची किंमत (SGB Issue Price) 5,334 रुपये प्रति ग्रॅम आहे. तसंच सोनेखरेदीसाठी ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देखील मिळेल. (हे वाचा-ऑगस्टमध्ये 17 दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी) Sovereign Gold Bond ची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून होते. यातील कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही बाँड योजनेमध्ये सामील होऊ शकता. गोल्ड बाँडचा मॅच्यूरिटी पीरिअड 8 वर्षांचा असतो, पण गुंतवणूकदाराकडे पर्याय असतो की त्याला 5 वर्षात हे काढू शकतात. 5 वर्षांनी पैसे काढल्यानंतर कॅपिटल गेन टॅक्स देखील लावला जात नाही.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold

    पुढील बातम्या